शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यातील ‘ती’ जमीन अखेर वनविभागाच्या नावावर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:03 IST

या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन राखीव वन’ अशी नोंद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही जमीन पुन्हा वनविभागाला हस्तांतरित करण्यात आली आहे.

पुणे : कोंढवा येथील वनजमिनीच्या बेकायदा हस्तांतरणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही २९ एकर जमीन आता वनविभागाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केला आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन राखीव वन’ अशी नोंद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही जमीन पुन्हा वनविभागाला हस्तांतरित करण्यात आली आहे.कोंढवा येथील सुमारे ३२ एकर जमीन रिची रीच हाऊसिंग सोसायटीला देण्याचा वादग्रस्त निर्णय घेण्यात आला. या संदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निकालानंतर ही जमीन परत घेऊन ती वनविभागाला सोपविण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या जागेवर प्रत्यक्ष पडताळणी केली होती. त्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर बाबी तपासून डुडी यांनी सातबारा उताऱ्यात बदल करून फेरफार निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही जमीन आता वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. याचे स्वतंत्र आदेशही देण्यात आले आहेत.या ३२ एकर जमिनीपैकी तीन एकर वीस गुंठे जमीन अनारक्षित करून ती संबंधित संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आली होती. प्रत्यक्षात केवळ एवढ्याच जमिनीचे हस्तांतर होणे अपेक्षित असताना संपूर्ण ३२ एकर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. हे लक्षात आल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ही २९ एकर जमीन सध्या अप्रत्यक्षरीत्या वनविभागाकडे असली तरी महसूल अभिलेखात अर्थात सातबारा उताऱ्यावर संबंधित संस्थेची मालकी दाखविण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर ही जमीन वनविभागाच्या मालकीची झाली आहे. त्यासाठी उताऱ्यावरील नाव बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडforest departmentवनविभाग