शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सणसवाडीत थर्माकॉल कारखान्याला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:40 IST

सणसवाडी येथील थर्माकॉल बनविणा-या थर्मो प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही.

कोरेगाव भीमा : सणसवाडी येथील थर्माकॉल बनविणा-या थर्मो प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कारखान्याचे संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. या घटनेत जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.   मंगळवारी या कारखान्याला अचानक आग लागली. आगीची दाहकता इतकी प्रचंड होती की काही क्षणात कारखान्याच्या संपूर्ण गोडाऊनचा काही क्षणात ताबा घेतला. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरू लागले. शेजारी असलेल्या हर्षओगल कारखान्यातील शशिकांत पवार यांनी तत्काळ आपल्या कारखान्यातील कामगारांना बोलावले. तसेच पवार यांनी प्रसंगावधान दाखवून कंपनीतील पाण्याच्या पाईपच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र, थर्माकॉल लगेच पेट घेत असल्याने व पॅकिंगसाठी आवश्यक असलेल्या पुठ्ठेही त्याठिकाणी असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. या आगीचे लोळ सणसवाडी, कोरेगाव भीमापर्यंत दिसत होते. सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते, पोलीस पाटील दत्तात्रय माने,पोलीस हवालदार  बाळासाहेब थिकोळे, योगेश नागरगोजे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील दोन अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.त्यांनी प्रथम वनविभागाच्या जागेमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणून नंतर कंपनीतील आग विझवली. दरम्यान, पुणे महानगरपालिकेचा देखील एक अग्निशमक बंब त्या ठिकाणी दाखल झाला. गावातून पाण्याचे टँकर उपलब्ध करून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुमारे एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यावेळी शेजारी असलेल्या वनविभागाच्या जागेमध्ये देखील आगीच्या ठिणग्या उडाल्याने वनविभागाच्या जागेमध्ये देखील आग पसरू लागली. आणि तीन अग्निशामक दलाच्या साह्याने आग पूर्णपणे विझाविण्यात आली. परंतु,तोपर्यंत कंपनीचे संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले होते.  

.................. सणसवाडी औद्यागिक क्षेत्रात अग्निशमक यंत्रणेचा अभावपुणे नगर महामार्गावर वाघोली, कोरेगाव भीमा, सणसवाडी व शिक्रापूर याठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढली आहे. मात्र, कारखान्यांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करण्यासाठी कारखानदार उदासीन असल्याचे पुन्हा एकदा चित्र पाहण्यास मिळाले. ग्रामपंचायत आणि कारखानदार अशा दोघांनी हा अग्नी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना निर्मितीसाठी प्रयत्न केला पाहिजे.                                                                                                                                                                                                रमेश सातपुते, सरपंच 

 

  

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल