भुशी धरणात पडून ठाण्यातील तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 05:06 IST2018-06-23T05:06:49+5:302018-06-23T05:06:57+5:30

लोणावळा परिसरात गुरुवारी दुपारी मित्रांसोबत वर्षाविहाराकरिता आलेल्या अंबरनाथ (जि. ठाणे) येथील एक युवा पर्यटक भुशी धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाला.

Thane youth dies after falling in Bhushi dam | भुशी धरणात पडून ठाण्यातील तरुणाचा मृत्यू

भुशी धरणात पडून ठाण्यातील तरुणाचा मृत्यू

लोणावळा : लोणावळा परिसरात गुरुवारी दुपारी मित्रांसोबत वर्षाविहाराकरिता आलेल्या अंबरनाथ (जि. ठाणे) येथील एक युवा पर्यटक भुशी धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाला. भुशी धरणात पर्यटक बुडण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. स्थानिक जीवरक्षक, शिवदुर्ग मित्र, लोणावळा शहर पोलीस व अपघातग्रस्तांच्या मदतीला या पथकाने शोधमोहीम राबवली. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सुरेंद्र तुकाराम कदम (वय २४, रा. अंबरनाथ, ठाणे) असे मृत पर्यटकाचे नाव आहे.

Web Title: Thane youth dies after falling in Bhushi dam