शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

TET Exam | टी.ई.टी. परीक्षा घोटाळ्यात संचालक डॉ. प्रितिष देशमुख यास जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 16:57 IST

सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे साहेब यांनी हा निर्णय दिलेला आहे

पुणे :  सन २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितिष दिलीपराव देशमुख यास पुणे सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा निर्णय दिलेला आहे.

प्रकरणाची थोडक्यात अशी की, सन २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षक भरतीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेचे संचालनाचे काम हे जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीस देण्यात आले होते. सदर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून अपात्र उमेदवारास पात्र म्हणून घोषित करून तसा निकाल जाहीर केल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणाची उघड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे सदर बाबत फिर्याद दिली होती. या प्रकरणात संचालक प्रितिष देशमुख यास दिनांक २२/१२/२०२१ रोजी अटक करण्यात आली होती व आरोपी याने त्याचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांचे मार्फत न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती.

सदर प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास पूर्ण झालेला असून दोषारोप पत्र सुद्धा दाखल करण्यात आले आहे. तसेच मा. उच्च न्यायालयाने यापूर्वी घेतलेल्या दखली मध्ये प्रस्तुत प्रकरणात आरोपींची आपापसात भेट हे संगनमत होत नाही असे नमूद केले होते. तसेच, संचालक आरोपी हा सदर घोटाळा करते वेळी कंपनीत कार्यरत नव्हता व त्यास चुकीच्या पद्धतीने संचालक असे दाखविण्यात आले असल्याची बाब आरोपीतर्फे ॲड .विजय ठोंबरे यांनी मांडली. तसेच, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक प्रकरणातील दाखले देत Bail is rule and jail is exception असा युक्तिवाद आरोपीतर्फे मांडण्यात आला.

सदर प्रकरणात आरोपी व अभियोग पक्षाची बाजू लक्षात घेत मे. सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. ए. पत्रावळे यांनी संचालक प्रीतेश देशमुख याची ५० हजार रुपये रक्कम रुपयाचे जातमुचलक्यावर सुटका केलेली आहे. तसेच त्यावर देशाबाहेर न जाण्याची व पुराव्यात छेडछाड न करण्याची व इतर बंधने लादण्यात आलेली आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार, ॲड दिग्विजयसिंह ठोंबरे, ॲड. आशुतोष शेळके यांनी काम पाहिले. तसेच, विष्णु होगे यांनी सहाय्य केले.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाCrime Newsगुन्हेगारी