शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

TET Exam Scam| बनावट प्रमाणपत्रे देऊन केले पास; ६५० बोगस प्रमाणपत्रे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 11:52 IST

बनावट प्रमाणपत्रे देऊन पास केल्याचा प्रकार समोर...

पुणे : टीईटी गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवे नवे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. राज्य परीक्षा परीषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे (tukaram supe) याने इतरांशी संगनमत करुन निकाल लागल्यानंतर अनेकांना बनावट प्रमाणपत्रे देऊन त्यांना पास केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना आतापर्यंत २०१९-२० ची ४०० बनावट प्रमाणपत्रे आढळून आली आहेत. तर २०१८ च्या परीक्षेमध्ये पास झाल्याचे दाखवून २५० बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

टीईटी परीक्षेमध्ये तुकाराम सुपे, डॉ. प्रीतीश देशमुख, आश्विनकुमार यांनी एजंटांना हाताशी धरुन हजारो अपात्र परीक्षार्थींकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांना पात्र करुन घेतले. मुळ निकालात त्यांची नावे घुसविली. यावरच हे आरोपी थांबले नाहीत, तर निकाल लावल्यानंतर तुकाराम सुपे याच्याकडे आलेल्या यादीतील परीक्षार्थींना पात्र ठरवून त्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्याचे आदेश दिले. तसेच अनेकांना त्यांनी बनावट प्रमाणपत्रांची फोटो कॉपी काढून पोस्टांनी पाठवून दिल्याचे निष्पन्न झाले आहेत.

सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात परीक्ष परीषदेकडे बाेगस प्रमाणपत्राबाबत ४५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच २०३ अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा पुरावा मिळाला आहे. तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व एजंटांकडून ८१ बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहे. जी ए सॉफ्टवेअर जप्त डिजिटल पुराव्याची पडताळणी सुरु आहे.याबाबत पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, टीईटी परीक्षेत आरोपींनी परीक्षेचा निकाल लावल्यानंतर अनेक अपात्र परीक्षार्थींना बनावट प्रमाणपत्रे दिली आहेत. शिक्षण विभागाने सर्वांकडून ही प्रमाणपत्रे मागविली आहेत. आतापर्यंतच्या तपासणीत २०१९ - २० मध्ये सुमारे ४०० आणि २०१८ मध्ये सुमारे २५० जणांना बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे आतापर्यंत आढळून आले आहे. ही संख्या अजून वाढू शकते.

पेपटफुटीतील आरोपी देशभरातील परीक्षा गैरव्यवहाराशी संबंधित सायबर पोलिसांनी आरोग्य भरती, म्हाडा, शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये अटक केलेल्या अनेक आरोपी हे देशातील विविध परीक्षा गैरव्यवहाराशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. यातील एका आरोपीने भारतातील अशा ४० परीक्षा केंद्रातील ठिकाणी ऑनलाईन परीक्षेत छेडछाड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड