शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: हातवारे, खाणाखुणा करत मतिमंद मुलीची साक्ष; बलात्कारातील आरोपीला १० वर्ष शिक्षा

By नम्रता फडणीस | Updated: May 6, 2024 17:40 IST

न्यायालयाने दहा वर्षांची कठोर शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली...

पुणे : मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून आरोपीने बलात्कार केल्याची दिलेली साक्ष न्यायालयात महत्वाची ठरली. आरोपीला भा.दं वि कलम ३७६ (२), जे आणि एल अंतर्गत दोषी ठरवून न्यायालयाने दहा वर्षांची कठोर शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा भोगावी लागेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी रागीट यांनी हा निकाल दिला.

प्रताप बबनराव भोसुरे (वय ५९ रा. धानोरे ता. शिरूर जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. पीडित मुलगी सकाळी ८ वाजता शेळ्या चारण्यासाठी रानात गेली होती. आरोपीने शेतातील पडीक जागेतील मंदिराजवळ पीडितेला गोळ्या खायला देतो म्हणून जवळ बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली असल्याचे पीडितेच्या आईने फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर आरोपीला १८ मे २०१५ मध्ये अटक करण्यात आली.

आरोपी हा गेली ८ वर्षे ११ महिने आणि १६ दिवसांपासून कारागृहात आहे. सरकारी वकील लीना पाठक यांनी या प्रकरणी ९ साक्षीदार तपासले. पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या असक्षम असल्याने तिला इन कॅमेरा काही प्रश्न विचारण्यात आले. पीडित मुलीने खाणाखुणा आणि हातवारे करून तिच्यावर आरोपीने केलेल्या जबरदस्तीची कहाणी सांगितली. न्यायालयात पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र बी खोपडे यांनी तपास केला. कोर्ट पैरवी कर्मचारी पोलीस हवालदार एस.बी भागवत आणि पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ज्ञानदेव सोनावणे तसेच कोर्ट पैरवी अंमलदार विद्याधर निचीत यांनी काम पाहिले.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय