शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मोबाईल अलर्ट.... घाबरू नका; सर्वांना 'या' कारणासाठी आले पॉप अप मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 12:25 IST

भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्ती काळात सूचना देण्यासाठी चाचणी सुरू असल्याचे या विभागाने यापूर्वी म्हटले होते...

पुणे : वेळ सकाळी साडेदहाची... मोबाईल अचानक व्हायब्रेट होऊन मोठ्याने वाजू लागला. मोबाईलमधून नेहमीच्या रिंगटोनपेक्षा वेगळा आणि मोठा आवाज आला. नेमका हा आवाज कशाचा काहीच समजेना.... आपला मोबाईल हॅक झाला किंवा त्यातील डेटा चोरीला गेल्याच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त झाले. मात्र यात चिंता करण्यासारखे काही नसल्याचे समोर येत आहे. केंद्र अथवा राज्य सरकारने याबद्दल घोषणा केली नसली, तरीही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग अशा स्वरूपाची सेवा देऊ शकण्याच्या क्षमतेचा आहे. विशिष्ट भौगोलिक परिसरात अथवा देशभरात एकाच वेळी सर्व मोबाईल नंबरवर आपत्कालीन सूचना पाठविण्याची या विभागाची क्षमता आहे.

भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्ती काळात सूचना देण्यासाठी चाचणी सुरू असल्याचे या विभागाने यापूर्वी म्हटले होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पोर्टल https://sachet.ndma.gov.in/ या विषयावर अधिक तपशिलाने माहिती देणारे आहे. राज्यात गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. काही ठिकाणी पूरस्थितीचाही धोका आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक मोबाईल युजरला आज सकाळी १०. २० ते १०. ३० च्या दरम्यान हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आपत्कालीन अलर्ट आला. 

भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्तीच्या वेळी असा अलर्ट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येणार आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे. भविष्यात आपल्या भागात काही आपत्कालीन सूचना द्यायची असेल तर आपल्या मोबाईलवर याप्रकारे अलर्ट दिला जाईल. आपल्याला असा अलर्ट आल्यास त्यावर दिलेल्या सूचना जरूर वाचाव्यात आणि त्यांचे पालन करावे, असे आवाहनही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या पोर्टलवर यापूर्वी केले आहे. मोबाईलमध्ये असे वायरलेस अलर्ट बंद करण्याची सुविधादेखील दिलेली आहे. परंतु आपण त्याचा वापर करू नये. कारण तसे केल्यास तुम्हाला आपत्तीच्या पूर्व सूचना येणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र