तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागेच!
By Admin | Updated: October 12, 2015 01:09 IST2015-10-12T01:09:04+5:302015-10-12T01:09:04+5:30
महापालिकेच्या सहापैकी अ, ब, ड व ई या चार क्षेत्रीय समिती सभांची कार्यक्रमपत्रिका व सभावृत्तान्त याबाबतची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर अपडेट केली

तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागेच!
देवराम भेगडे, किवळे
महापालिकेच्या सहापैकी अ, ब, ड व ई या चार क्षेत्रीय समिती सभांची कार्यक्रमपत्रिका व सभावृत्तान्त याबाबतची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर अपडेट केली जात नसल्याने नागरिकांना क्षेत्रीय समित्यांच्या सभेतील निर्णयांच्या माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. मात्र ‘क’ आणि ‘फ’ या क्षेत्रीय समितीच्या वतीने गेल्या महिन्यापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व सभांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे संकेतस्थळावर सभांची माहिती कधी अपडेट होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर जानेवारी २०१२ पासूनच्या महापालिकेच्या सर्व सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा, विधी समिती सभा, शहरसुधारणा समिती सभा, क्रीडा समिती सभा , महिला व बालकल्याण समिती सभा यांच्या कामकाजाची व निर्णयांची माहिती नियमित प्रसिद्ध केलेली आहे. मात्र महापालिकेच्या प्रशासकीय दृष्टीने जनतेला चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने स्थापलेल्या अ, ब, क, ड, ई आणि फ या सहा क्षेत्रीय समित्यांपैकी अ, ब, ड व ई या चार क्षेत्रीय समिती सभांची कार्यक्रमपत्रिका अगर निर्णयांची (ठरावांची) माहिती संकेतस्थळावर नियमित प्रसिद्ध
केली जात नाही. त्यामुळे
नागरिकांना आपल्या नगरसेवकांनी काय निर्णय घेतले आहेत,
याची माहिती मिळत नाही. माहितीपासून वंचित राहावे
लागत आहे. माहिती घ्यायचीच असेल, तर माहिती अधिकार कायद्यानुसार रीतसर अर्ज करून माहिती घ्यावी लागणार आहे.