शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 08:10 IST

जाहिरातीत आकर्षक ऑफरवर शेवटी ‘टर्म्स ॲंड कंडिशन्स अप्लाय’ असा इशारा असतो.....

जाहिरातीत आकर्षक ऑफरवर एक छाेटा स्टार असतो आणि तळात त्या स्टारपुढे ‘टर्म्स ॲंड कंडिशन्स अप्लाय’ असा इशारा असतो. अगदी तसंच 2021 मध्ये दैनंदिन जीवनात ‘टर्म्स ॲंड कंडिशन्स अप्लाय’ची अदृश्य तळटीप असेल अन् त्याचं भान आपल्याला राखावं लागेल. त्याविषयी...

नवा सूर्य अन् नवे जगजुनाच दाह, जुनीच धगनववर्षाचा वाहतोय वारानव्या 'ऑफर'वर छोटा तारातार्‍याखाली लिहिलं काय

 * टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

मागील वर्षाचा नवा मंत्र‘न्यू नॉर्मल’चे नवे तंत्रथर्मल गनने हळदी-कुंकूसॅनेटायझर तीर्थ शिंपडूनात्यांना कनेक्ट वाय फाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

माणसे-वाहने, नो डिफरन्स‘ऑल्वेज कीप सेफ डिस्टन्स’  शिक्षणच अवघे  ‘ऑनलाईन’प्रेमातही आता लक्ष्मण ‘लाईन’नकोशा क्राऊडला गुड बाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

लग्नातही विसरा भावकीअवघी ‘लिमिटेड माणूसकी’कोविड विघ्नास  नको आमंत्रणपन्नास जणांनाच द्या निमंत्रणवर-वधू पक्षांचा निरूपाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!मास्कमागून जिवाचा गुदमरचिमटा घेतोय ‘ऑक्सिमीटर’वेदना चेहऱ्यावर येत आहेमुखवट्यांमागे अविरत वाहेलसीकरण जरी असे उपाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

जगणं  ‘अनलॉक’  होत आहे‘लॉकडाऊन’  विसरू पाहेव्हायचं नसेल ‘क्वारंटाईन’सृष्टीलाच करा ‘व्हॅलेंटाईन’वेळ लागेल, येईल रिप्लाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

नव्या दशकाची आहे नांदीजुन्या अनुभवांतून घेऊ नोंदीविसरू चंगळ, राखू भानमार्केटने जरी उठवले रानजशी मागणी, तसा सप्लाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

दिवसांमागून दिवस जातीलरात्रींमागून रात्रीही जातीलऋतूही त्यास अपवाद नाहीनक्षत्रही कधी थांबत नाहीउत्पत्ती, लयीचे चक्र महाकाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

- अभय नरहर जोशी -

(लेखक ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)-- 

टॅग्स :PuneपुणेAdvertisingजाहिरातfraudधोकेबाजी