छेडछाडीला कंटाळून दहावीतील् मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:12 IST2021-04-02T04:12:32+5:302021-04-02T04:12:32+5:30
वरवंड येथील प्रकार : तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल वरवंड : वरवंड (ता. दौंड) येथे दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलीने ...

छेडछाडीला कंटाळून दहावीतील् मुलीची आत्महत्या
वरवंड येथील प्रकार : तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल
वरवंड : वरवंड (ता. दौंड) येथे दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी वरवंड येथे श्री गोपीनाथ विद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. शाळेत जात-येत असताना एक मुलगा तिला त्रास देत होता. त्याचे दोन मित्र त्याला मदत करीत होते. या मुलीने हा प्रकार वडलांना तसेच नातेवाईकांनाही सांगितला होता. संबधित मुलाच्या वडलांनाही याबाबत सांगितले होते. मात्र, तरीही हा प्रकार थांबला नाही. त्यामुळे त्रासाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. पुढील तपास
पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.