नगर-कल्याण रस्त्यावर तणाव, शेतकऱ्यांवर लाठीमार : पोलिसांवर दगडफेक
By Admin | Updated: June 3, 2017 00:52 IST2017-06-03T00:51:25+5:302017-06-03T00:52:23+5:30
पोलीस बंदोबस्तात जात असलेला दुधाचा टॅँकर अडविल्याने झालेल्या बाचाबाचीतून नगर-कल्याण रस्त्यावर तणाव निर्माण झाला

नगर-कल्याण रस्त्यावर तणाव, शेतकऱ्यांवर लाठीमार : पोलिसांवर दगडफेक
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - पोलीस बंदोबस्तात जात असलेला दुधाचा टॅँकर अडविल्याने झालेल्या बाचाबाचीतून नगर-कल्याण रस्त्यावर तणाव निर्माण झाला. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक करीत वाहनांचे नुकसान केले.
शेतकऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कात्रज दूध संघाचा पोलीस बंदोबस्तात जात असलेला टॅँकर शेतकऱ्यांनी अडविला. यातून पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकऱ्याने शेतकऱ्यांसंदर्भात चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त झाले. त्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेतकरी परिसरात जमले. रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास शेतकºयांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. यामध्ये पोलिसांच्या वाहनांचे नुकसानही झाले. रात्री उशिरापर्यंत शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून होते. राष्ट्रवादीचे नेते अतुल बेनके यांच्या उपस्थितीत सभा झाली. दरम्यान रात्री 11 वाजल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. पुणे नाशिक रस्त्यावर वाहने अडवून शेतीमालाची वाहतूक तपासली जात होती.