शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सल्लागार व ठेकेदार यांच्या संगनमतानेच वाढवली ‘जायका’ची निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 13:27 IST

केंद्र शासन आणि जपान सरकारच्या ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी’च्या(जायका) सहकार्याने मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरणासाठी ९८० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्राथमिक चौकशीत सल्लागारावर ठपका; कारवाई प्रस्तावित

सुषमा नेहरकर-शिंदे- पुणे : तब्बल ४८ कोटी रुपये मोजून नेमलेले सल्लागार आणि ठेकेदार यांच्या संगनमतानेच मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरण (जायका) प्रकल्पांतर्गत काढलेल्या निविदांची रक्कम फुगवण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) बांधण्यासाठी काढण्यात आलेल्या या निविदांची रक्कम वाढवल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. केंद्र शासन आणि जपान सरकारच्या ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी’च्या(जायका) सहकार्याने मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरणासाठी ९८० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एसटीपी बांधण्यासाठी सुमारे ४०० कोटी खर्चाच्या सहा निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा चार दिवसांपूर्वी उघडल्या. यात  संबंधित ठेकेदार कंपन्यांनी २३ ते शंभर टक्के जादा दराने निविदा भरल्याचे समोर आले. यापूर्वी ‘२४ बाय ७’ समान पाणीपुरवठा योजनेसाठीही याच प्रकारे जादा दराने निविदा दाखल केल्या होत्या. त्यामुळे योजनेचा खर्च तब्बल बाराशे कोटी रुपयांनी वाढला होता. त्याच पद्धतीने जायका प्रकल्पाचा खर्चदेखील सुमारे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांनी वाढल्याची भीती निर्माण झाली आहे. जायकाअंतर्गत ११ ठिकाणी  ‘एसटीपी’ बांधण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातल्या सहा प्रकल्पांसाठी ठेकेदार कंपन्यांनी दहा निविदा भरल्या आहेत. या सर्वच निविदा चढ्या दराने आल्या आहेत. ठेकेदार कंपन्यांनी २३, ५० आणि १०० टक्के अशा जादा दराने निविदा भरल्याचे निविदा उघडल्यानंतर स्पष्ट झाले. याबाबत आयुक्त सौरभ राव यांनी निविदांची तांत्रिक छाननी करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. प्राथमिक चौकशीमध्ये सर्व निविदा बाजारभावापेक्षा प्रचंड चढ्या दराने भरल्याचे स्पष्ट झाले असून, यासाठी ठेकेदारांना सल्लागार कंपनीने मदत केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याचा प्रस्तावदेखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...........समान पाणीपुरवठा योजनतेही  सल्लागारांचा भ्रष्टाचारशहरातील ‘२४ बाय ७’ समान पाणी पुरवठा योजनेसाठी यापूर्वी सल्लागाराच्या मदतीने ठेकेदार कंपन्यांनी तब्बल बाराशे कोटी रुपयांनी निविदा फुगवल्या होत्या. याची चौकशी झाल्यानंतर सल्लागार दोषी असल्याचे निदर्शनास आले होते. .........तक्रार दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण निविदा प्रक्रियाच रद्द करून नव्याने निविदा राबविण्याचे आदेश दिले होते. सल्लागाराचा भ्रष्टाचार वेळीच लक्षात आल्याने पुणेकरांचे बाराशे कोटी रुपये त्या वेळी वाचले. परंतु त्यानंतरदेखील संबंधित सल्लागारावर कोणतीही कारवाई झाली नाही. ....याचप्रकारे जायका प्रकल्पामध्येही सल्लागाराच्या मदतीने ठेकेदारांनी निविदा कोट्यवधी रुपयांनी फुगवल्या आहेत. या वेळी तरी सल्लागारावर कारवाई होणार का, यावर प्रश्नचिन्हच आहे. ..........लंडनचे सल्लागार नद्यांच्या शुद्धीकरणासाठी राबिण्यात येणाºया जायका प्रकल्पासाठी केंद्र शासनाने ४८ कोटी रुपये देऊन लंडनस्थित मेसर्स पेल फ्रिचमन (लीड पार्टनर) ही सल्लागार कंपनी नियुक्ती केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका