शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अपहरण, बाललैंगिक अत्याचार व बलात्कारप्रकरणी चाकण येथील युवकास दहा वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 22:18 IST

अपहरण करून बाललैंगिक अत्याचार व बलात्कार प्रकरणामध्ये चाकण येथील १९ वर्षीय तरुणास १० वर्षांची शिक्षा आज ठोठावण्यात आली आहे.

चाकण - अपहरण करून बाललैंगिक अत्याचार व बलात्कार प्रकरणामध्ये चाकण येथील १९ वर्षीय तरुणास १० वर्षांची शिक्षा आज ठोठावण्यात आली आहे. खेड सेशन्स कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. सलगर यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. ज्ञानेश्वर रंगराव भालेराव ( वय १९ वर्ष, रा. चाकण ता. खेड जि. पुणे, मुळगाव ब्राह्मण शेवगे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, १२ ऑक्टोबर २०१५ रोजी रात्री ९ ते १४ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान चाकण, मंचर व जळगाव जिल्ह्यातील निमगाव शिवार या ठिकाणी आरोपीने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. याबाबत चाकण पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.५३९/२०१५ नोंद आहे.या गुन्ह्यात आरोपीला भा.दं.वि.कलम ३६३ अन्वये ५ वर्षं शिक्षा व १००० रुपये दंड, भा. दं. वि. ३७६ अन्वये १० वर्षं शिक्षा व १००० रुपये दंड, पोक्सो कायदा कलम ४ अन्वये ७ वर्ष व १००० रुपये दंड, पोक्सो कायदा कलम ६ अन्वये १० वर्ष कलम ८ अन्वये ए वर्ष व ५०० रुपये दंड आणि कलम १० अन्वये ५ वर्ष व ५०० रुपये दंड अशी एकत्रित दहा वर्षे शिक्षा माननीय सेशन्स जज्ज ए. यस. सलगर सो. राजगुरुनगर खेड यांनी ठोठावली. या गुन्ह्याचा तपास मंचर व जळगाव येथे जाऊन केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुहास ठोंबरे व रायटर पोलीस कॉन्स्टेबल पोखरकर यांनी तपास करून कोर्ट अंमलदार राजेंद्र सोनवणे, सरकारी वकील गिरीश कोबल व मकरंद औरंगाबादकर यांनी कामकाज पहिले.

टॅग्स :Puneपुणेjailतुरुंग