दहा गावांचा कचरा प्रश्न मार्गी लावणार : कुसुम मांढरे

By Admin | Updated: February 14, 2017 01:30 IST2017-02-14T01:30:49+5:302017-02-14T01:30:49+5:30

पुणे-नगर महामार्गावरील शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील गावांचा कचरा टाकायचा कोठे? हा प्रश्न गंभीर झाला आहे.

Ten villages will be asked to solve the problem of waste: Kusum Mandhare | दहा गावांचा कचरा प्रश्न मार्गी लावणार : कुसुम मांढरे

दहा गावांचा कचरा प्रश्न मार्गी लावणार : कुसुम मांढरे

कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावरील शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील गावांचा कचरा टाकायचा कोठे? हा प्रश्न गंभीर झाला आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी व कोरेगावसह १० गावांचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावतानाच या प्रकल्पातून ग्रामपंचायती सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे शिक्रापूर गटाच्या उमेदवार कुसुम मांढरे यांनी सांगितले.
मांढरे म्हणाल्या की, पुणे-नगर महामार्गावरील शिरूर तालुक्यात रांजणगाव औद्योगिक वसाहत, सणसवाडी-कोरेगाव भीमा-शिक्रापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाल्याने नागरीकरणातही प्रचंड वाढ झाली. त्यातच ग्रामपंचायतींपुढे नागरी सुखसुविधा पुरविण्याबरोबरच कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिकीकरणामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडले असल्याने ग्रामपंचायतींना कचऱ्यासाठी स्वत:ची जागा खरेदी करणेही अशक्य असल्याने कचरा टाकायचा कोठे? हा प्रश्न भेडसावत आहे.
रांजणगावमध्ये कचऱ्यापासून सीएनजीनिर्मितीच्या उभा राहणार असलेल्या प्रकल्प तालुक्यातील कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापुरी, रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, तळेगाव ढमढेरे या १० गावांत मिळून कंपनी स्थापन करण्यात येईल. हा बहुउद्देशीय प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. यातून मिळणाऱ्या नफ्यामुळे ग्रामपंचायतींना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार होणार असल्याने या प्रकल्पासाठी स्वत: पाठपुरावा करून हा प्रकल्प तत्काळ मार्गी लावण्यावर भर देणार असल्याचे सणसवाडी गणाच्या मोनिका नवनाथ हरगुडे, जयमाला शिरीष जकाते आदींनी सांगितले.

Web Title: Ten villages will be asked to solve the problem of waste: Kusum Mandhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.