दहा जणांना मोक्का
By Admin | Updated: January 10, 2015 01:01 IST2015-01-10T01:01:03+5:302015-01-10T01:01:03+5:30
पुणे-मुंबई दु्रतगती महामार्गासह परिसरात संघटितपणे लूटमार करणाऱ्या दहा जणांच्या टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

दहा जणांना मोक्का
पिंपरी : पुणे-मुंबई दु्रतगती महामार्गासह परिसरात संघटितपणे लूटमार करणाऱ्या दहा जणांच्या टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. यापूर्वीही एका टोळीवर मोक्का लावला होता.
टोळीप्रमुख पिंट्या उर्फ सुनिल उर्फ इगनास दिपक वाघमारे (वय २४, रा. केळवली, ता. खालापूर, जि. रायगड), विजय गणपत वाघमारे (वय ४२), अविनाश वसंत मुकणे (वय २६), विजय लक्ष्मण वाघमारे (वय २६), अॅन्थोन गोविंद वाघमारे (वय २१), चार्लस राजु वाघमारे, पिंट्या धनगर, पांग्या वसंत जाधव, (वय २१, सर्व रा. कुणेगाव, ता. मावळ, पुणे),
मारूती वाघमारे, विलास पवार (दोघेही रा. कडाव, ता. कर्जत, रायगड) यांच्यावर मोक्का (महाराट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींकडून लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संघटीतपणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.(प्रतिनिधी)
प्रस्तावास मंजुरी
४आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर थोरात व पोलीस निरिक्षक आय. एस. पाटील यांनी कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष महानिरिक्षक रितेश कुमार यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने दहा जणांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली.