दहावी - बारावी परीक्षेत यंदाही १० मिनिटे वाढून मिळणार, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

By प्रशांत बिडवे | Published: January 24, 2024 04:07 PM2024-01-24T16:07:54+5:302024-01-24T16:09:17+5:30

राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बुधवारी दि. २४ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली....

Ten minutes will be increased in class X-XII examination this year too, the decision of the State Board of Education | दहावी - बारावी परीक्षेत यंदाही १० मिनिटे वाढून मिळणार, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

दहावी - बारावी परीक्षेत यंदाही १० मिनिटे वाढून मिळणार, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेत गतवर्षी परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटे पूर्वी प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत बंद केली होती. तसेच परीक्षेच्या एकूण कालावधीत दहा मिनिटे वेळ वाढवून दिला होता. यंदाही फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी- बारावी परीक्षेत हीच पद्धत कायम ठेवण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बुधवारी दि. २४ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. मात्र, दहावी- बारावी परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाजाचे परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याचे काही घटनांतून  निदर्शनास आलेले आहे.

परीक्षेतील गैरप्रकार आणि घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.मात्र,  विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांचे वेळीही सकाळ सत्रात सकाळी ११ वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी ३ वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. तसेच परीक्षेच्या शेवटी १० मिनिटे वेळ वाढवून देण्यात येणार आहे.

परीक्षेच्या अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे सकाळ सत्रात स. १०.३० वाजता तसेच दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

परीक्षेची सध्याची वेळ आणि कंसात (सुधारित वेळ)  सकाळ सत्र 
स. ११ ते २ (दु. २.१०) स. ११  ते दु. १  (दु. १.१०) 
स. ११ ते दु. १.३० ( दु.१.४०) 

दुपार सत्र

दु. ३  ते सायं. ६ (सायं. ६.१०) 
दु. ३ ते सायं. ५ (सायं. ५.१०) 
दु. ३ ते सायं. ५.३० (सायं.५.४०) 

Web Title: Ten minutes will be increased in class X-XII examination this year too, the decision of the State Board of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.