शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात व्यावसायिकाला १० लाखांची मागितली खंडणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 17:37 IST

नऱ्हे गावात व्यवसाय करण्यासाठी कंपनी सुरु करणाऱ्या व्यावसायिकाला कंपनीत भागीदारी दे नाही तर दरमहा १० लाख रुपये खंडणी दे, अशी मागणी करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य व त्याच्या कार्यकर्त्यांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल : नऱ्हे ग्रामपंचायत सदस्यासह इतर तीन जणांचा समावेश

पुणे : नऱ्हे गावात व्यवसाय करण्यासाठी कंपनी सुरु करणाऱ्या व्यावसायिकाला कंपनीत भागीदारी दे नाही तर दरमहा १० लाख रुपये खंडणी दे, अशी मागणी करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य व त्याच्या कार्यकर्त्यांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग़्रामपंचायत सदस्य सागर भूमकर व विकी पोकळ, कृष्णा कडू, घनशाम हिवाळे आणि त्यांचे इतर साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी एका २६ वर्षांच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे़. काही महिन्यांपूर्वी फिर्यादी हे व्यावसायासाठी पुण्यात आले. ते नवीन कपडे तयार करुन त्याचे मार्केटिग करतात़. त्यांनी नऱ्हे गावात आपली कंपनी सुरु केली आहे़. सागर भूमकर हे ग्रामपंचायत सदस्य आहेत़. गेल्या महिन्यात त्यांना विकी पोकळ याचा फोन आला व त्याने खंडणीची मागणी केली़. त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी सागर भूमकर यांनी फोन करुन त्यांना झील चौकातील आपल्या आॅफिसमध्ये बोलावले़. त्यावेळी त्यांच्यासोबत विकी पोकळ, कृष्णा कडू, घनशाम हिवाळे व इतर जण होते़ त्यांनी कंपनीमध्ये आम्हाला भागीदारी दे असे सांगितले़ नाही तर दरमहा १० लाख रुपये खंडणी दे़ नाही तर तुझे बरे वाईट करुन तुझी कंपनी बंद पाडतो, तुला व तुझ्या कुंटुबियांना गोळ्या घालीन अशी धमकी दिली़. याप्रकरणी त्यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे गेल्या महिन्यात तक्रार अर्ज दिला होता़. त्यानंतर त्यानुुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. नऱ्हे ग्रामपंचायतीमध्ये सध्या सागर भूमकर याचे पॅनल निवडून आले आहे़. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbusinessव्यवसाय