शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीचा नादच खुळा! सरपंच निवडणुकीसाठी आणले चक्क दहा बाऊन्सर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 16:37 IST

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे....

बारामती : एकीकडे सरपंच पदाच्या निवडीनंतर पैशांचा पाउस पडल्याची घटना ताजी असतानाच आता सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी चक्क बाउन्सर आणले गेले आहेत. बारामती तालुक्यातील शिरष्णे गावातली ही घटना आहे. या गावच्या सरपंच निवडणुकीत चक्क दहा बाऊन्सर आणले गेले. पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

शिरष्णे गावची गुरुवारी(दि २५) सरपंच निवड होती. या पदासाठी बिनविरोध निवडीची कोणतीही शक्यता नव्हती,या पार्श्वभूमीवर सरपंचपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेपूर्वी ग्रामपंचायतीसमोर दहा बाऊंसर्स येऊन थांबले. त्यानंतर हा एकच चर्चेचा विषय ठरला.

बारामती तालुक्यात काही गावांत सत्तांतर झाले आहे. तालुक्यात ४८ गावांत निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, सर्वच गावात ग्रामंपचायत निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. तसेच कालपासुन सुरु असलेली सरपंचपद निवडणूक देखील त्याला अपवाद नाही. सरपंच निवड देखील शांततेत सुरु आहेत. मात्र, शिरष्णे गावात प्रथमच निवडणुकीच्या निमित्ताने बाऊन्सर आणण्यात आले. त्याची सर्वत्र चर्चा होती.  सरपंचपदाची निवडणूकीसाठी काहीसे तणाव निर्माण होण्याची चर्चा होती. ही चर्चा पोलिसांपर्यत पोहचली का नाही,याबाबत ग्रामस्थांचे तर्क-वितर्क सुुरु होते.  

ही निवडणूक दबावाखाली झाल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी आक्षेप घेण्यात आला. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया रद्द करता येत नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी संबधित अर्ज निकाली काढल्याचे समजते.  दरम्यान,हे बाउन्सर नेमके कोणी आणले,हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

कोरोनाच्या नियमावलीकडे या बाऊन्सर मंडळींनी दुर्लक्ष केल्याचे यावेळी दिसून आले. येथे आणलेले  बाऊंसर विनामास्क असल्याचे व्हायरल झालेल्या फोटोवरुन दिसून आले.त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.सर्वसामान्यांवर या कारणासाठी दंडात्मक कारवाईचा दंडुका उगारणारे प्रशासन बाऊन्सरला मोकळीत का देते,हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांनी याबाबत माहिती घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.——————————

 

टॅग्स :Baramatiबारामतीgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचElectionनिवडणूकPoliceपोलिस