खेड शिवापूर नाक्यावरील टोलवाढीला तात्पुरती स्थगिती, टोलनाका प्रशासनाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 10:51 AM2024-04-05T10:51:11+5:302024-04-05T10:52:36+5:30
दरवर्षी साधारणपणे एक एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोलनाका प्रशासनाच्या वतीने साधारणपणे टोल रकमेच्या अडीच ते पाच टक्केपर्यंत टोल रकमेमध्ये वाढ केली जाते...
खेड शिवापूर (पुणे) :पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर येथील टोलनाक्यावर एक एप्रिलपासून होणारी टोलवाढ लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्यामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती टोलनाका प्रशासनाकडून देण्यात आली.
दरवर्षी साधारणपणे एक एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोलनाका प्रशासनाच्या वतीने साधारणपणे टोल रकमेच्या अडीच ते पाच टक्केपर्यंत टोल रकमेमध्ये वाढ केली जाते. याच अनुषंगाने यावर्षीही ही अडीच टक्के एवढी वाढ करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याकारणाने संबंधित टोल वाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.