शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पालखी सोहळ्यानिमित्त यवत, केडगाव, पाटस स्थानकांवर रेल्वेचे तात्पुरते थांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:21 IST

संत तुकाराम महाराज पालखीनिमित्त मध्य रेल्वेकडुन यवत, केडगाव व पाटस रेल्वे स्थानकावर काही गाड्यांना एक मिनिटांचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सोयीसाठी ९ जुलै ते १२ जुलै या कालावधीत हे थांबे

पुणे : संत तुकाराम महाराज पालखीनिमित्त मध्य रेल्वेकडुन यवत, केडगाव व पाटस रेल्वे स्थानकावर काही गाड्यांना एक मिनिटांचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ९ जुलै ते १२ जुलै या कालावधीत हे थांबे असतील. त्यामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. पालखीनिमित्त रेल्वेकडून पहिल्यांदाच अशाप्रकारे काही गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून दि. ९ जुलै रोजी सोलापुर महामार्गाने पुढे जाणार आहे. या मार्गावरील प्रवाशांसाठी तीन स्थानकांवर गोवा एक्सप्रेस, हैद्राबाद एक्सप्रेस, पुणे-सोलापुर एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस या गाड्यांना एक मिनिटांसाठी थांबविले जाणार आहे. दि. १२ जुलैपर्यंत या गाड्या यवत, केडगाव व पाटस या स्थानकांवर थांबतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.दरम्यान, या मार्गावरील अन्य काही थांब्यांवरही गाड्या थांबविण्याची गरज आहे. तसेच केवळ पालखीदरम्यान थांबा देण्याऐवजी हे थांबे नियमित करायला हवेत. त्याचा अनेक प्रवाशांना लाभ होईल, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे.------------- यवत रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या१) वास्को द गामा-निजामुदिन गोवा एक्सप्रेस - पहाटे ४.४५ २) निजामुदिन-वास्को द गामा गोवा एक्सप्रेस - दुपारी ३.२९३) हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस - सकाळी ८.०९ ४) मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस - सायंकाळी ५.१५ 

------------ केडगाव रेल्वे स्थानकावर थांबणाºया गाड्या १) पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस - सकाळी १०.०४  २) सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस - सायंकाळी ५.०२ ---------------- पाटस रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या१) पुणे -सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस - सायंकाळी ६.४२ २) सोलापूर- पुणे हुतात्मा एक्सप्रेस - सकाळी ९.३०

 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाSolapurसोलापूर