शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यामध्ये वसतीगृहात उभारले तात्पुरत्या स्वरुपाचे कारागृह; किमान तीनशे जणांची होणार व्यवस्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 19:40 IST

या नव्याने तयार करण्यात आलेल्या तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे

ठळक मुद्देयात 92 पुरुष कैदी तर 09 महिला कैदी यांचा समावेश तुरुंगासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने घ्यावी लागत आहे याठिकाणी अधिक दक्षता

पुणे : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तुरुंगात कोरोनाची लागण होऊ नये यासाठी कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. आता नव्याने येणाऱ्या कैद्यांकरिता येरवड्यातील बार्टी कार्यालयाजवळील मागासवर्गीय मुलांमुलांच्या वसतीगृहात तात्पुरत्या कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था 4 मे पासून करण्यात आली आहे. यात 92 पुरुष कैदी तर 09 महिला कैदी यांचा समावेश आहे. या तुरुंगात किमान तीनशे जणांना ठेवता येणार आहे.    सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार कैद्यांच्या सुटकेसाठी हाय पावर कमिटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यात या कमिटीने सात वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांना सोडण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. सध्या येरवडा कारागृहातून मोठ्या संख्येने कैदी सोडण्यात आले आहेत. मात्र नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना चार मागासवर्गीय मुलांमुलींच्या वसतीगृहात तयार करण्यात आलेल्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

 'लोकमत' ला माहिती देताना येरवडा कारागृहाचे पोलीस अधिक्षक यु टी पवार म्हणाले, येरवडा तुरुंग प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यांच्या परवानगीने सध्या इ कॉमर्स झोन जवळील मागासवर्गीय वसतीगृहात कैद्यांना ठेवण्यात येत आहे. या नव्याने तयार करण्यात आलेल्या तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे. चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महिला कारागृहाच्या बाहेर देखील सुरक्षाव्यवस्था तैनात आहे. तुरुंगासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने याठिकाणी अधिक दक्षता घ्यावी लागत आहे. यासाठी पुणे पोलिसांची देखील मदत घेण्यात आली आहे.    अंतर्गत सुरक्षेसाठी तुरुंग प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. या कारागृहात 92 कैद्यांना ठेवण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील कैद्यांची काळजी घेण्यात आली आहे. तुरुंगात आल्यानंतर त्यांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. अद्याप कुणी आढळलेला नाही. नवीन येणा-या कैद्यांमुळे कारागृहातील कैद्यांना त्रास होऊ नये यासाठी नव्या तात्पुरत्या कारागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. यापुढे प्रशासनाकडून ज्या सुचना येतील त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. असे पवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेyerwada jailयेरवडा जेलjailतुरुंगPrisonतुरुंगcorona virusकोरोना वायरस बातम्या