कोरेगाव भीमा : येथे दुचाकीस्वारास पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोची धडक बसल्याने तो खाली पडून व दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून टेम्पोचे चाक गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व योगेश मोरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार किरण भाऊसाहेब चौधरी (वय २१, रा. थापेवाडी, पाबळ, ता. शिरूर) हा पुणे-नगर महामार्गावरून नगर बाजुकडून पुण्याकडे दुचाकी (एमएच १२ एलएक्स ९५२१) वरून जाताना सत्यनारायण दुकानासमोर पाठीमागून भरधाव टेम्पो येत होता. लाल रंगाच्या टेम्पोची धडक बसली. त्यामुळे किरण चौधरी हा खाली पडला. त्याच्या डोक्यावरून टेम्पोचे चाक गेल्याने किरण जागीच ठार झाला. (वार्ताहर)
टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार
By admin | Updated: March 27, 2017 02:24 IST