अपघात झाल्यानंतर पळून जात असलेल्या टेम्पो चालकास जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST2021-05-10T04:10:20+5:302021-05-10T04:10:20+5:30
याप्रकरणी टेम्पो चालक विश्वनाथ नवनाथ केदार (वय २७, रा. शिरूर कासार, जि. बीड) यास जेरबंद करून यवत पोलिसांच्या ताब्यात ...

अपघात झाल्यानंतर पळून जात असलेल्या टेम्पो चालकास जेरबंद
याप्रकरणी टेम्पो चालक विश्वनाथ नवनाथ केदार (वय २७, रा. शिरूर कासार, जि. बीड) यास जेरबंद करून यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार: शनिवार (८ मे) रोजी सायंकाळी सहा वाजणेच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर यवत टोलनाक्याचे पुढे थोड्या अंतरावर टेम्पो (नंबर एमएच १४ ईएम ७१६३) यावरील
वाहनचालकाने दुचाकी स्वारास भरधाव वेगाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. टेम्पो चालक अपघात झाल्यानंतर तेेथे थांबता तसेच अपघाताची खबर न देता पुढे पुणे बाजूकडे पळून जात असल्याबाबतची खबर नागरिकांनी शहर पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.
अपघात करणारे वाहन पळून गेले असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस ठाणे अंमलदार यांच्यामार्फत त्वरित
लोणी काळभोर व उरुळी कांचन बिट मार्शल यांना कळविण्यात आली. सदरची गाडी सोलापूर-
पुणे रोडने पुणे बाजूकडे जात असताना, बिट मार्शल कर्डिले, सणस, बांगर तसेच ऑक्सिजन टँकर पायलटिंगचे गाडीवरील चालक महाजन, घोलप, पडवळ यांनी सदर टेम्पो सायंकाळी ६ - १५ वाजण्याच्या सुमारास नायगाव फाटा (ता. हवेली) येथे अडवले व टेम्पो चालक विश्वनाथ केदार यास ताब्यात घेतले. तपासात त्याने अपघात केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला यवत पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी तत्परतेने व वेळेत पार पाडली त्याबाबत सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर कल्याणराव विधाते व लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.