शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, इंदापुरातील विठ्ठलवाडीत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:12 IST

टेम्पोची धडक बसून दुसºया दुचाकीवर जावून आदळल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देऐन दसºयाच्या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदापूर अकलूज रस्त्यावर विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली.इस्माईल अजमुद्दीम शेख यांनी इंदापूर पोलिसांना या बाबत माहिती दिली.इस्माईल अजमुद्दीम शेख यांच्या मुलाचा पाय मोडला. 

इंदापूर : टेम्पोची धडक बसून दुसºया दुचाकीवर जावून आदळल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ऐन दसºयाच्या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदापूर अकलूज रस्त्यावर विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली.नवनाथ माणिक नलवडे  (वय ३५, रा. नलवडेवस्ती, झगडेवाडी, ता. इंदापूर) असे मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. इस्माईल अजमुद्दीम शेख (रा. हनुमानवाडी, वडापुरी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिसांना या बाबत माहिती दिली. ठाणे अंमलदार अरुण रासकर यांनी सांगितले, की खबर देणार शेख हे आपल्या मुलासह दुचाकीवरुन (क्र. एमएच ४२ सी १५७२) कामानिमित्त इंदापूरला निघाले होते. विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर इंदापूर कडून अकलूजच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस (क्र.एमएच ४२ एबी ८०९५) इंदापूर कडे निघालेल्या टेम्पोचा धक्का लागला. ती दुचाकी शेख यांच्या दुचाकीस धडकल्याने झालेल्या अपघातात त्या दुचाकीवरील नवनाथ नलवडे यांचा जागीच मृत्यू झाला. शेख यांच्या मुलाचा पाय मोडला. अधिक तपास सहायक फौजदार दत्तात्रय जाधव करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेAccidentअपघात