संत सोपानकाका देवस्थानच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST2021-06-24T04:08:48+5:302021-06-24T04:08:48+5:30

सोमेश्वरनगर: पुरंदर तालुक्यातील सासवड येथील संत सोपानकाका देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ११ लाख रुपयांचा धनादेश ...

Of the temple of Saint Sopankaka | संत सोपानकाका देवस्थानच्या

संत सोपानकाका देवस्थानच्या

सोमेश्वरनगर: पुरंदर तालुक्यातील सासवड येथील संत सोपानकाका देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर, निंबूत ग्रामस्थांच्या वतीने ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

सोमेश्वर कारखान्याच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून रथ देण्यात येतो. तर, सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबाकडून दर वर्षी पालखी सोहळ्यासाठी मानाची बैलजोडी दिली जाते. तसेच, कारखान्याकडून दर वर्षी पालखी सोहळ्याची कारखानास्थळावर राहण्याची व जेवणाची सोय केली जाते. ११ लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल नुकताच कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा सत्कार देवस्थानच्या वतीने करण्यात आला.

यावेळी संत सोपानकाका देवस्थानचे अध्यक्ष त्रिगुण गोसावी, देवस्थानचे मानकरी नितीन कुलकर्णी, कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक लक्ष्मण गोफणे, मोहन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच निंबूत ग्रामस्थांच्या वतीने देखील ५ लाखांचा धनादेश देवस्थानचे अध्यक्ष गोसावी यांच्याकडे देण्यात आला. या वेळी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे उपस्थित होते.

——————————————

पुरुषोत्तम जगताप यांचा सत्कार करताना त्रिगुण गोसावी.

२३०६२०२१-बारामती-०२

Web Title: Of the temple of Saint Sopankaka