चासचे ज्ञान मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान
By Admin | Updated: July 8, 2014 23:35 IST2014-07-08T23:35:37+5:302014-07-08T23:35:37+5:30
आंबेगाव तालुक्यातील चास येथे संत ज्ञानेश्वरांनी वेद वदवून घेतलेल्या रेडय़ाचा दशक्रिया विधी झाला होता. ग्रामस्थांनी येथे संत ज्ञानेश्वराचे मंदिर बांधले

चासचे ज्ञान मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान
मंचर : आंबेगाव तालुक्यातील चास येथे संत ज्ञानेश्वरांनी वेद वदवून घेतलेल्या रेडय़ाचा दशक्रिया विधी झाला होता. ग्रामस्थांनी येथे संत ज्ञानेश्वराचे मंदिर बांधले असून, ते भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. येथे दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात़. ज्ञानमंदिर या नावाने हा परिसर प्रसिद्ध आह़े
सह्याद्रीच्या पर्वतरागांच्या कुशीत व निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या रम्य परिसरात चास हे गाव आहे. गावाच्या पूर्व दिशेला नदी पात्रत 1 कि़ मी़ पर्यंत कुंड आह़े या कुंडाजवळ संत ज्ञानेश्वराचे मंदिर असून, त्याची अख्यायिका ग्रामस्थ सांगतात़ संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ग्याना नावाच्या रेडय़ाकडून वेद वदविले तो रेडा घेऊन ती व त्यांची भावंडे आळंदीस निघाली. जुन्नर तालुक्यातील आळे येथे सर्व आले असता, रेडय़ाचे निधन झाल़े आतिव दु:खाने ज्ञानदेवांनी ग्यानाचा अंत्यविधी आळे गावात केला़ दशक्रिया विधी दक्षिण वाहिनी पात्रतच करावा, असा विचार करून ते दक्षिण वाहिनी नदीपात्रचा शोध घेत चास येथे पोहोचल़े ग्याना रेडय़ाची दशक्रिया शास्त्रोक्तविधीनुसार पार पाडून ते भावंडासह आळंदी येथे गेले, अशी अख्यायिका चास ग्रामस्थांनी दिली़
ज्ञानदेवादी भावंडांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या घोडगंगेच्या पात्रत त्याकाळच्या चास ग्रामस्थांनी दगडी चौथ:यावर दगडाचीच एक दगडी समाधी स्थापन केली़ हाच म्हसोबा पुढे शेकडो वर्षे गावचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाऊ लागला़ त्याचा उत्सव दर वर्षी साजरा होत होता़ सन 1959-6क् च्या दरम्यान वैकुंठवासी ह़ भ़ प़ कोंडाजीबाबा डेरे कीर्तनसेवा करताना त्यांनी ज्ञानदेवांचे जीवन चरित्र सांगितले व ज्ञानदेवांच्या रेडय़ाचा दशक्रिया विधी येथे झाल्याने तुम्ही भाग्यवान आहात़ ज्ञानदेवाच्या पदस्पर्शाने तुमचा गाव पावन झाला आहे म्हणून तुम्ही ज्ञानदेवाचे मंदिर उभारा, असे सांगितल़े त्यानंतर माशाच्या आकाराच्या मंदिरात 1961 साली ज्ञानेश्वरमहाराजांच्या मूर्तीची ग्रामदैवत म्हणून प्रतिष्ठापना करण्यात आली़ (वार्ताहर)