शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Summer In Maharashtra| मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील तापमानात वाढ; राज्यात सर्वात कमी तापमान पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 12:12 IST

गेल्या २-३ दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे

पुणे: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर कमी झाल्याने राज्यात आता उन्हाळाची सुरुवात होत असल्याची जाणीव होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बऱ्याच ठिकाणच्या तापमानात वाढ होत आहे. पुण्यात सध्या अल्हाददायक वातावरण असून, राज्यातील सर्वात कमी किमान तापमान पुण्यात १३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या २-३ दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३५.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

पुणे शहरात सध्या दिवसात काहीसा उकाडा व सायंकाळनंतर गारवा जाणवतो. उपनगरात रात्रीच्यावेळी थंड वाऱ्यामुळे थंडी जाणवावी इतका गारवा असतो. शहरातील कमाल तापमान ३३.६ अंशावर गेले असून, ते सरासरीपेक्षा १ अंशाने अधिक आहे. पुढील काही दिवस ते ३३ अंशांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी रात्रीचे तापमान सरासरीइतके दिसून येत आहे.

त्यात पुढील दोन दिवसांनंतर वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे तापमान- १३ अंश सेल्सिअस

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रSummer Specialसमर स्पेशल