शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूर्णी ते लातूर रस्ता अडकला लालफितीत : मार्ग पूर्ण झाल्यास वेळ आणि पैसे वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 11:52 IST

मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा रस्त्या म्हणून टेंभूर्णी ते लातूर रस्त्याच्या प्रस्ताव तयार करण्यात आला.

ठळक मुद्देकेंद्र शासनाकडे रस्त्याच्या मंजूरीचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी आला पाठवण्यात रस्त्याच्या कामास लवकरच सुरू होईल , नितीन गडकरी यांचे आश्वासन

पुणे: मराठवाड्यातून लहान मोठ्या कामासाठी पुण्यात येणा-या मजूरांना अहमदनगर मार्गे किंवा सोलापूर मार्गे लांबचा प्रवास करावा लागतो. मात्र, टेंभूर्णी ते लातूर मार्ग पूर्ण झाल्यास या मजूरांचा वेळ आणि पैसे वाचणार आहेत. परंतु, सुमारे तीन वर्षांपासून या रस्त्याची फाईल केंद्र शासनाकडे पडून आहे. रस्त्याच्या अंतिम मंजूरीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरूवात व्हावी,यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांना केंद्राकडे खेटे मारावे लागत आहेत.मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा रस्त्या म्हणून टेंभूर्णी ते लातूर रस्त्याच्या प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे या रस्त्याच्या मंजूरीचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी पाठविण्यात आला. परंतु, गेल्या तीन वर्षात या रस्त्याच्या मंजूरीबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणातून अनेक वेळा या रस्त्याच्या कामास लवकरच सुरूवात केली जाईल, असे आश्वासन दिले. परंतु, अद्याप या रस्त्याच्या कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मराठवाड्यातून पुणे व परिसरात येणा-या दुष्काळग्रस्तांना सुमारे शंभर किलो मिटरचा अधिकचा प्रवास करून यावे लागत आहेत, असे एमएसआरडीसीच्या अधिका-यांनी सांगितले.टेंभूर्णी ते लातूर हा सुमारे 165 कि.मि.चा रस्ता तीन जिल्ह्यातून जाणार आहे.त्यासाठी अकराशे कोटी रुपये प्रस्तावित केले आहे. वर्षातील सुमारे पाच महिने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मजूरांची वाहतूक होत असते. बीड, लातूर आदी भागातून कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजूर याच रस्त्याने पुण्याकडे ये-जा करतात. त्यामुळे टेंभूर्णी ते लातूर रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. सातारा- म्हसवड - टेंभूर्णी - कुरूडवाडी - बार्शी - लातूर असा हा रस्ता प्रस्तावित केला आहे. सोलापूरसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. सत्ताधारी राजकीय नेत्यांनी या रस्त्याचा उल्लेख आपल्या भाषणांमधून अनेक वेळा केला. परंतु,रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात व्हावी,यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही,असेही एमएसआरडीसीच्या अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेlaturलातूरSolapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरी