शाळाशाळांत लागले टीव्ही, रेडिओ, एलसीडी

By Admin | Updated: September 6, 2014 00:53 IST2014-09-06T00:53:08+5:302014-09-06T00:53:08+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार विद्याथ्र्यार्पयत पोहोचविण्यासाठी महापालिका शाळांमध्ये तसेच खासगी शाळांमध्ये दूरचित्रवाणी संच, एलसीडी प्रोजेक्टर आणि रेडिओची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

Television, radio, LCD | शाळाशाळांत लागले टीव्ही, रेडिओ, एलसीडी

शाळाशाळांत लागले टीव्ही, रेडिओ, एलसीडी

पिंपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार विद्याथ्र्यार्पयत पोहोचविण्यासाठी महापालिका शाळांमध्ये तसेच खासगी शाळांमध्ये दूरचित्रवाणी संच, एलसीडी प्रोजेक्टर आणि रेडिओची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. चिंचवड, रहाटणी भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यामध्ये व्यत्यय आला. तर उर्वरित शाळांमध्ये दूरचित्रवाणी संच लावले होते. काही शाळांनी तर प्रोजेक्टर लावले, परंतु तांत्रिक अडचणीमुळे वारंवार व्यत्यय येऊ लागताच, त्यावर मात करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून रेडिओ वापरण्यात आले. 
शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांचे भाषण, तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विद्याथ्र्याशी थेट संवाद साधण्याचा कार्यक्रम पाहता-ऐकता येईल, यासाठी महापालिकेच्या 132 शाळांमध्ये दूरचित्रवाणी संच, प्रोजेक्टर, इंटरनेट अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. उर्दू शाळा, गोदावरी हिंदी विद्यालय, तसेच इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी यंत्रणा तयार ठेवली होती. दुपारी 3 ते 4.45 या कालावधीत हा कार्यक्रम असल्याने विद्याथ्र्याना दुपारी दोनलाच शाळेत बोलावण्यात आले होते. विद्याथ्र्याना 3 र्पयत कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहत बसावे लागले. पंतप्रधानांचे भाषण सुरू झाले, त्या वेळी मात्र कधी आवाज ऐकू न येणो, इंटरनेट बंद होणो, जोडणी व्यवस्थित न झाल्याने प्रोजेक्टर सुरू होण्यास अडचण अशा अनंत अडचणी आल्या. येणा:या अडचणींवर मात करत विद्याथ्र्यानी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
जीवनात छोटय़ा छोटय़ा गोष्टींचे महत्त्व लक्षात घ्या. पर्यावरणाचे रक्षण करा. जे जे शक्य ते सेवाभावी वृत्तीने करा, तीच देशसेवा आहे. थोरांचे जीवनचरित्र वाचा, इतिहासाच्या जवळ जा. खेळण्या-बागडण्याच्या वयात आनंद घ्या. स्वत:मधील बालपण हरवू देऊ नका. 125 कोटी देशवासीय माझा परिवार आहे, ही भावना मनात रुजली पाहिजे. राजकारणाकडे व्यवसाय म्हणून न पाहता सेवा म्हणून पाहण्याची वृत्ती हवी.आपुलकी असेल तरच सेवाभाव वृद्धिंगत होतो, हे पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेले विचार विद्याथ्र्याना प्रेरणादायी ठरले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर संवाद साधून त्यांनी विद्याथ्र्याना काही प्रश्न विचारले. तसेच विद्याथ्र्यानी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरेही दिली. या विषयीची चर्चा कार्यक्रमानंतर विद्याथ्र्यामध्ये रंगली.  (प्रतिनिधी)
 
4 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार विद्याथ्र्यार्पयत पोहोचविण्यासाठी विविध शाळांमध्ये यंत्रणा उपलब्ध करून दिली होती. त्या ठिकाणी विद्याथ्र्याची संख्या अधिक होती. शिक्षकांची संख्या मात्र अत्यल्प होती. महापालिका शाळेचे बहुतांश शिक्षक सत्कार समारंभ संपल्यानंतर आपापल्या घरी निघून गेल्याने पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची व्यवस्था केलेल्या शाळांमध्ये त्यांची अनुपस्थिती जाणवली. शाळांमध्ये पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची व्यवस्था करा, असे परिपत्रक काढले असले, तरी भाषण ऐकण्याची सक्ती होत असल्याचा आक्षेप नोंदवला जाताच सक्ती नाही, ऐच्छिक असेल, अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे शिक्षकांमध्येही संभ्रमावस्था होती. शिक्षकांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. 
 

 

Web Title: Television, radio, LCD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.