शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीत मोठी कामगिरी, मंडळांकडून देखावे करत दखल; पण दबंग अधिकारी संदीपसिंग गिल यांची बदली

By नितीश गोवंडे | Updated: September 5, 2024 22:08 IST

-तेजस्वी सातपुते नव्या पोलिस उपायुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे :पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबई येथील पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केली आहे. याचे आदेश गृह विभागाकडून गुरुवारी (दि. ५) देण्यात आले. ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. यासह राज्यातील १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शहरातील कोयता गँगचा बीमोड करण्यासाठी गिल यांनी केलेली कामगिरी, गेल्यावर्षी गणेशोत्सवादरम्यान त्यांनी केलेले नियोजन हे पुणेकरांसाठी चर्चेचा विषय ठरले होते.

नोव्हेंबर २०२२ मध्ये गिल्ल यांची पुण्यात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. शहराचा ह्रदय समजल्या जाणार्‍या मध्यभाग आणि पेठांचा परिसर असणार्‍या परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी त्यांची नियुक्त करण्यात आली होती. गणेशोत्सव काळात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त हे अतिशय महत्त्वाचे पद समजले जाते. गणेशोत्सवात त्यांनी केलेले कामकाज कौतुकास्पद होते. मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात संदीप गिल्ल यांच्या नावाने देखावे लागले होते. परिमंडळ १ मध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मितभाषी अधिकारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. पुण्यात काम करताना गिल्ल हे दबंग अधिकारी म्हणून ओळखले जात होते.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस