शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : धायरीत बलात्कार करणारा निघाला मुलीचा सख्खा काका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 10:54 IST

धायरीत राहत्या घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात सिंहगड पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्दे धायरीत राहत्या घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात सिंहगड पोलिसांना यश आले आहे.सख्या काकानेच हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.नितीन दामोदर असे काकाचे नाव असून तो मुलीच्या मावशीचा पती आहे.

पुणे : धायरीत राहत्या घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात सिंहगड पोलिसांना यश आले आहे. सख्या काकानेच हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.

नितीन दामोदर असे काकाचे नाव असून तो मुलीच्या मावशीचा पती आहे. नितीन एका दुकानात काम करतो. आई वडिल कामावर गेल्यानंतर एकट्या असणाऱ्या या १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. त्याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना नव्हती. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने तसेच या मुलीच्या मोबाईल व अन्य बाबीपासून काहीही पुरावा उपलब्ध झाला नव्हता. सिंहगड पोलिसांना मध्यरात्री काही तांत्रिक माहिती तसेच परिसरात केलेल्या पाहणी व चौकशीतून नितीन दामोदर याच्या बाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. अतिशय गंभीर गुन्ह्याचा तपास 12 तासात लावण्यात सिंहगड पोलिसांना यश मिळाले आहे.

मुलीचे कुटुंबिय सिंहगड भागातील धायरेश्वर वस्ती येथील  एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहते,  ही मुलगी परिसरातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिला एक 13 वर्षांचा भाऊ असून, तो आठवीत शिकतो. तिचे आई-वडिल मोल-मजूरीचे कामे करतात. नेहमीप्रमाणे आई-वडिल गुरुवारी सकाळी कामासाठी घराबाहेर पडले होते. तर भाऊ शाळेत गेला होता. त्यामुळे ही मुलगी घरी एकटीच होती. तिचा भाऊ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी आल्यानंतर त्याने बहिण बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली पाहिली. भावाने तिला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकदा आवाज देऊनही ती उठत नसल्याने त्याने आई-वडिलांना फोनकरून याबाबत माहिती दिली.  मुलाचा फोन आल्यामुळे आई-वडिलांनी तत्काळ घरी धाव घेतली. यानंतर त्यांनी त्वरीत तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, तिचा हात, पाय आणि गळ्यावर जखमा झाल्या आहेत. शवविच्छेदन करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदनात बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.

टॅग्स :PuneपुणेRapeबलात्कार