तंत्रज्ञान विभागाने मिळविली 11 पेटंट

By Admin | Updated: November 12, 2014 00:03 IST2014-11-12T00:03:28+5:302014-11-12T00:03:28+5:30

सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठात केवळ 3 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक व विद्याथ्र्यानी एकत्रित संशोधन करून 11 पेंटंट मिळविली आहेत.

Technology Department gets 11 patents | तंत्रज्ञान विभागाने मिळविली 11 पेटंट

तंत्रज्ञान विभागाने मिळविली 11 पेटंट

पुणो : सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठात केवळ 3 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक व विद्याथ्र्यानी एकत्रित संशोधन करून 11 पेंटंट मिळविली आहेत. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थी संशोधन क्षेत्रतही मागे नाहीत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
डॉ. रघुनाथ शेवगावकर यांच्या कार्यकाळात तंत्रज्ञान विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागाच्या माध्यमातून संशोधनाला प्राध्यान्य देण्यासाठी विविध औद्योगिक कंपन्यांशी सहकार्य करार करण्यात आला. त्यामुळे विद्याथ्र्याना शिक्षण घेत असताना औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली. या विभागाने 11 नोव्हेंबर 2क्11 अर्थात 11-11-11चे औचित्य साधून एका वर्षात 11 पेटंट विद्यापीठाच्या नावावर करण्याचा निश्चिय केला होता. त्यानुसार विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र, पेटंटना मान्यता मिळण्याची प्रक्रिया संथ असल्याने 11 नोव्हेंबर 2क्14 रोजी या विभागाने पेटंट मिळविल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)
 
तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. आदित्य अभ्यंकर,भूषण गरवारे, डॉ. सुभांगी केळकर, शैलेश कुलकर्णी, राजेंद्र तलवारे, डॉ. बी. पी. पाटील, डॉ. कुलबीर सिंग, तुषार जाधव, अनुजा फडके, अभिजित चित्रे, रेश्मा आपटे, डॉ. वाय. एच. दंडवते, एस. एन. धारवाडकर यांनी संशोधन करून 11 पेटंट मिळवली आहेत. डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी पेटंट मिळविणा:या प्रत्येक विद्याथ्र्याला मार्गदर्शन केले आहे. विभागप्रमुख डॉ. एस. आय. पाटील यांचेही या विद्याथ्र्याना सहकार्य लाभले आहे.
 
4बोटांच्या ठशांचे बायोमॅट्रिक पद्धतीने प्रमाणिकरण, बोटांच्या ठशांची व डोळ्यांच्या प्रमाणीकरणाची पद्धती यावरील पेटंट 2क्13मध्ये मंजूर झाले असून, ‘ए सिस्टीम अॅड मेथड फॉर होमोग्राफी बेस्ड हायब्रिड मिक्चुअल 
मॉडेल फॉर रेहेब इंजिनिअरिंग’, टुवर्ड्स कॅरातक्टरायङोशन अॅण्ड सिंथिसिस ऑफ इंडियन नोटल म्युङिाकल साऊंड थ्रू फ्रेमवर्क ऑफ अॅनॅलॅटिकल मोडेलिंग आदी विषयांवरील पेटंट 2क्14मध्ये विद्यापीठाच्या नावावर जमा झाली आहेत.

 

Web Title: Technology Department gets 11 patents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.