तुमची मुलगी चिडवते, सांगणाऱ्यास चपलेने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:11 IST2021-05-10T04:11:26+5:302021-05-10T04:11:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लहान मुलींच्या भांडणानंतर तुमची मुलगी चिडवते अशी, तक्रार करणाऱ्यास महिलेने चपलेने मारहाण केली. त्याची ...

Teasing your daughter, slapping the teller | तुमची मुलगी चिडवते, सांगणाऱ्यास चपलेने मारहाण

तुमची मुलगी चिडवते, सांगणाऱ्यास चपलेने मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लहान मुलींच्या भांडणानंतर तुमची मुलगी चिडवते अशी, तक्रार करणाऱ्यास महिलेने चपलेने मारहाण केली. त्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये देण्यास जात असताना पुन्हा पती-पत्नीच्या डोक्यात जेवणाचा डबा, काठीने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी लोणी कंद पोलिसांनी दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी उद्धव एकनाथ भोसले (वय ३५, रा. आव्हाळवाडी) यांनी लोणी कंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ७ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. नारायण चव्हाण, मंदा नारायण चव्हाण (दोघे रा. बाजारतळ चौक, वाघोली) आणि रेखा व तिचा पती (रा. माळवाडी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

उद्धव भोसले यांच्या आव्हाळवाडी येथील घरासमोरून नारायण चव्हाण व त्यांची पत्नी मंदा हे कामावर जात होते. यावेळी उद्धव भोसले व त्यांच्या पत्नीने चव्हाण यांना तुमची मुलगी आमचे मुलीला चिडवते. तुम्ही तिला समजावून सांगा, असे म्हणत असताना मंदा हिने उद्धव भोसले यांना चपलीने मारहाण केली. तेव्हा फिर्यादी यांच्या पत्नीने भांडणे सोडविली. त्यानंतर ते सकाळी साडेदहा वाजता तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना आरोपींनी दोघांना शिवीगाळ करून भोसले व त्यांच्या पत्नीच्या डोक्यात जेवणाचा डबा मारून व काठीने मारहाण करून जखमी केले.

Web Title: Teasing your daughter, slapping the teller