पुणे : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, थुंकून विद्रुपीकरण करणाऱ्यांना देशातील युवक समाजभानाचे धडे देणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या विरोधात युवकांना सहभागी करून घेत चळवळ उभी करण्याची सुचना सर्व विद्यापीठांना दिल्या आहेत. ‘येथे थुंकू नये’, अशा पाट्या ठिकठिकाणी दिसतात. पण अनेकदा या पाट्यांवरच गुटखा, पानमसाला खाऊन थुंकल्याचे चित्र पाहायला मिळते. कोणतेही सरकारी कार्यालय असो की बस, रेल्वे, स्थानके, दवाखाने, उद्याने, चित्रपटगृह, बहुतांश इमारतींच्या जिन्यांचे कोपरे रंगलेले दिसतात. त्यामुळे काही इमारतींमध्ये जिन्यांच्या कोपऱ्यांत देव-देवतांची छायाचित्र लावलेली दिसतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने विविध आजार पसरतात. त्या ठिकाणाचे विद्रुपीकरण होते, दुर्गंधी पसरते.
युवक देणार समाजभानाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 17:49 IST
‘येथे थुंकू नये’, अशा पाट्या ठिकठिकाणी दिसतात. पण अनेकदा या पाट्यांवरच गुटखा, पानमसाला खाऊन थुंकल्याचे चित्र पाहायला मिळते.
युवक देणार समाजभानाचे धडे
ठळक मुद्देकुठेही थुंकण्याचे प्रकार रोखण्यासाठी युवक लोकांमध्ये जनजागृती सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे किंवा थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार