शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकत्व ही नोकरी नव्हे; व्रत : डॉ. प्र.चिं शेजवलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 20:10 IST

विद्यार्थ्यांना वर्गात आणि वर्गाबाहेर ही शिक्षक हवे हवेसे वाटले पाहिजेत...

ठळक मुद्देनिर्मळ माणूसच निखळ विनोद निर्माण करू शकतोआज शिक्षकांचे तेज का लुप्त झाले आहे याचे चिंतन केले पाहिजे.

पुणे: उत्तम अध्यापन हाच शिक्षकांचा खरा धर्म आहे.अध्यापनात केवळ पाटया टाकून चालत नाही .शिक्षकांनी ज्ञानदान करण्याबरोबर ज्ञानयोजक झालं पाहिजे. विद्यार्थ्यांना वर्गात आणि वर्गाबाहेर ही शिक्षक हवे हवेसे वाटले पाहिजेत .शिक्षकत्व ही नोकरी नाही, व्रत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ञ डॉ प्र.चिं शेजवलकर यांनी केले.उत्कर्ष प्रकाशनाच्या वतीने डॉ. शेजवलकर लिखित ''आम्ही विद्याव्रती आणि यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन'' या पुस्तकाचे प्रकाशन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ अशोक कामत आणि डॉ सुधीर राशिंगकर यांच्या हस्ते तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या लय भारी या विनोदी कथा संग्रहाचे प्रकाशन लेखक श्याम भुर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रकाशक सु. वा. जोशी उपस्थित होते डॉ. शेजवलकर म्हणाले, कोणताही माणूस एका रात्रीत मोठा होत नाही. व्यवस्थापन कौशल्याबरोबर अपार मेहनत करण्याची तयारी हवी.सुसंवाद साधण्याचे आणि विचार करण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास माणूस यशस्वी होतो. मनात असेल तर स्वत:त बदल करणे सहज शक्य आहे. डॉ. कामत म्हणाले, ज्याचे यश निर्भेळ असते आणि ज्याच्या यशाने इतरांना आनंद होतो तोच  माणूस खरा यशस्वी असतो.ज्यांच्याकडे नीतिमूल्ये नाहीत. असत्य मेव जयते हाच ज्यांच्या धर्म आहे अशीच माणसे आज आपल्या दुदैवार्ने राजकारणात आहेत.अशा काळात समाजाला आपल्या कामातून शिक्षकच बळ देऊ शकतात. प्रा जोशी म्हणाले,काही वर्षांपूर्वी जीवनाच्या सर्व क्षेत्रात शिक्षकांचा प्रभाव होता. अत्रे, पुल ,साने गुरुजी आणि ग प्र प्रधान यांनी लोकशिक्षकांची भूमिका बजावली. आज शिक्षकांचे तेज का लुप्त झाले आहे याचे चिंतन केले पाहिजे. आर्थिक समृद्धी येत असताना ज्ञानाची श्रीमंतीही वाढली पाहिजे.शिक्षकांच्या जागलेपणात विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची ज्योत प्रज्वलित होत असते म्हणूनच शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. भुर्के यांनी निर्मळ माणूसच निखळ विनोद निर्माण करू शकतो. विनोदामुळे मन निर्मळ होते. उत्तम विनोदी लेखन करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि विनोद बुद्धी हवी असल्याचे सांगितले.  सु वा जोशी यांनी प्रास्ताविक केले . सुधीर राशिंगकर यांनीही मनोगत व्यक्त केले. विनय वाघ यांनी आभार मानले.  --------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षक