शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

डेटा एंट्रीच्या भाराने शिक्षक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 20:10 IST

राज्य शासनाने राज्यातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची सर्व माहिती सरल प्रणालीमध्ये शिक्षकांकडून आॅनलाइन भरून घेतली होती. त्या व्यतिरिक्त आणखी काहीस्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम (एसडीएमआयएस) प्रणालीमध्ये शिक्षकांनी भरायची आहे.

ठळक मुद्देराज्यातील शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा मोठयाप्रमाणात बोजा पुन्हा नवीन एंट्रीचे काम : केवळ १० दिवसांची मुदत

पुणे : सध्या परीक्षा, पेपर तपासणे, निकाल आदी कामांमध्ये शिक्षक व्यस्त असताना १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची माहिती २५ एप्रिलच्या आत आॅनलाइन प्रणालीमध्ये भरण्याचे आदेश राज्यातील शिक्षकांना देण्यात आले आहेत. मागील वर्षी सुरू झालेले सरल डाटा एंट्रीचे काम अजून पूर्ण झाले नसतानाच पुन्हा एका नवीन एंट्रीचे काम शिक्षकांवर थोपविण्यात आले आहे.  राज्य शासनाने राज्यातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची सर्व माहिती सरल प्रणालीमध्ये शिक्षकांकडून आॅनलाइन भरून घेतली होती. त्या व्यतिरिक्त आणखी काही स्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम (एसडीएमआयएस) प्रणालीमध्ये शिक्षकांनी भरायची आहे. यापूर्वी सरलमध्ये भरलेल्या माहितीचा डाटाबेस एसडीएमआयएसला जोडला आहे. त्याव्यतिरिक्त आणखी माहिती केंद्र शासनाकडून मागविण्यात आली आहे. ती माहिती येत्या २५ एप्रिलच्या आत भरून देण्याचे निर्देश शिक्षकांना देण्यात आले आहे. केंद्र शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षक शिक्षण आदी योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे एकत्रीकरण करून एकच समग्र योजना राबविली जाणार आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांचे गणवेश, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षण याविषयक आराखडा तयार केला जाणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक राज्याकडून पहिली ते बारावी विद्यार्थ्यांची माहिती मागविली आहे. राज्यातील शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा मोठयाप्रमाणात आहे. त्यातच सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यानंतर पेपर तपासणी करून १ मेच्या आत निकाल लावायचा आहे. त्याचबरोबर जूनच्या पहिल्या आठवडयात ९ वीच्या फेर परीक्षांचे आयोजन करण्याच्या सुचना शिक्षण संचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. विद्या प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या चाचण्यांचेही शाळांनीच करायचे आहे. आता पुन्हा दहा दिवसांच्या आत डेटा एंट्री करण्याचे फर्मान शिक्षण विभागाकडून सोडण्यात आल्याने शिक्षक वैतागले आहे. ज्ञानदान करण्याचे काम सोडून डेटा एंट्री आॅपरेटरच बनून रहावे लागत असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र