निवडणूक कामातून शिक्षकांना सवलत मिळावी
By Admin | Updated: January 25, 2017 01:39 IST2017-01-25T01:39:55+5:302017-01-25T01:39:55+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कामांमधून महिला, अपंग शिक्षक व बी. एल. ओ. कर्मचाऱ्यांना वगळण्यात

निवडणूक कामातून शिक्षकांना सवलत मिळावी
निमोणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कामांमधून महिला, अपंग शिक्षक व बी. एल. ओ. कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचारी म्हणून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नेमणूक केली जाते. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या याद्या संबंधित शाळांकडून मागविण्यात आल्या आहेत. मात्र या कामासाठी महिला व अपंग शिक्षक यांची नेमणूक केल्यास मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते.
कामाचा अतिरिक्त ताण येतो. याशिवाय अनेक शिक्षक व कर्मचारी वर्षभर बीएलओ म्हणून निवडणुकीचेच काम करीत असतो. त्यामुळे या निवडणुकांमधून महिला शिक्षिका, अपंग शिक्षक यांना निवडणुकीसाठी आदेश देऊ नये, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनांनी
केली आहे.
या आशयाचे निवेदन शिरूरचे तहसीलदार पोळ यांना निवेदन दिले आहे. या वेळी शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, उपाध्यक्ष दीपक सरोदे, अखिल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी वाळके, शिक्षकनेते अनिल महाजन उपस्थित होते.(वार्ताहर)