शिक्षक दिनानिमित्त मंचर येथील शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST2021-09-07T04:15:07+5:302021-09-07T04:15:07+5:30

अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय विस्तारित इमारतीचा उद्घाटन समारंभ तसेच एकत्रित सभागृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ पार ...

Teachers felicitated at Manchar on the occasion of Teachers' Day | शिक्षक दिनानिमित्त मंचर येथील शिक्षकांचा सत्कार

शिक्षक दिनानिमित्त मंचर येथील शिक्षकांचा सत्कार

अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय विस्तारित इमारतीचा उद्घाटन समारंभ तसेच एकत्रित सभागृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ पार पडला.त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षक मंगेश हनुमंत जावळे, रेखा थोरात, वैशाली वळसे, अतुल पाटील, डॉ. दिलीप नंदनवार, श्रीधर जोशी, काळूराम कानडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते संजय राऊत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, आमदार अतुल बेनके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले.

--

फोटो ओळी : ०६मंचर शिक्षक दिन

फोटोखाली:शिक्षक दिनाचे औचित्य साधून अवसरी खुर्द येथे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Teachers felicitated at Manchar on the occasion of Teachers' Day