वाकडमध्ये शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: January 28, 2015 02:32 IST2015-01-28T02:32:07+5:302015-01-28T02:32:07+5:30
फोन आणि एसएमएस करून बदनामीची धमकी देणाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षिकेने नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला

वाकडमध्ये शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी : फोन आणि एसएमएस करून बदनामीची धमकी देणाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षिकेने नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना वाकड पूलावर रविवारी (दि.२५) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. ४३ वर्षीय या शिक्षिका शाहूनगरमध्ये राहतात. या प्रकरणी मुथैया
आरमुगम तेवर (वय ५४, रा. संभाजीनगर, काळवाडी फाटा) याला अटक केली आहे.
शिक्षकेने वाकड पुलावरून नदीत उडी मारली; पण तेथील एका मच्छिमाराने त्यांना त्वरित पाण्याबाहेर काढल्याने प्राण वाचले. एका इसमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. शिक्षिका शाहूनगर येथे राहत असल्याने याबाबत निगडी पोलिसांना कळविण्यात आले.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तेवर पीएमपीचालक आहे.
कामाला जाताना तिची त्याच्याशी ओळख झाली. यातून तिचा मोबाईल क्रमांक घेतला. यानंतर तिला तो धमकावत होता.(प्रतिनिधी)