शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

‘बर्वे बाईं’च्या सल्ल्यामुळेच नावारूपाला आलो : गजेंद्र अहिरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 21:28 IST

माझ्या लेखक, दिग्दर्शक, कथाकार, पटकथाकार आणि गीतकार या वाटचालीत बर्वे बाईंची भूमिका महत्वाची आहे...

ठळक मुद्देलोकप्रिय व्यक्ती होण्यापेक्षा रसिक प्रिय व्हायला मला नेहमी आवडते.

बारामती : कोणताही माणूस मोठा होण्यासाठी मागे आई, शाळेतील शिक्षक, सहकारी व मित्रपरिवार यांची महत्वाची भूमिका असते. माझ्या शालेय जीवनात मोकळया तासाला उनाडक्या करणारा मी शाळेतील शिक्षिका मनिषा बर्वे यांच्या सल्ल्यामुळेच लेखक, दिग्दर्शक, कथाकार, पटकथाकार  आणि गीतकार म्हणून नावारुपाला येऊ शकलो, अशी भावना दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी व्यक्त केली. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हल्पमेंट ट्रस्ट बारामती, शारदानगर, शारदा कला मंचआयोजित परिवर्तनव्याख्यान मालेच्या ९६ व्या पुष्पानिमित्ताने अहिरे यांची प्रगट मुलाखत पार पडली. यावेळी आहिरे यांनी आपण लेखक कसे बनलो, बालपण कसे गेले तसेच आयुष्याचा प्रवास उलगडला. माझी आई, शिक्षिका मनिषा बर्वे, यांनी मार्गदर्शन केले नसते तर मी तुमच्या समोर आलोच नसतो. त्यांनी माझ्यातील लेखक ओळखला होता. लहान असलाना मला फेकायची सवय होती. मला फेकूचंद म्हणूून सर्व मित्र चिडवत होते. बर्वे मोकळ्या तासाला मला बोलायला लावत होत्या. मी जे सांगत होतो ते सर्व कथा होत्या. हे त्यांच्या लक्षात आले. आवडलेले लेखन करण्यास सांगितले. तेथून माझ्यातील लेखकाचा जन्म झाला. डॉ. मुंगी यांनी मुलाखतीत विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे अहिरे यांनी दिली. अन्य दिग्दर्शक ज्या पध्दतीने काम करतात; त्यापेक्षा वेगळे काहीतरी करण्याची उर्मी व धमक पहिल्यापासूनच माझ्यात होती. लोकप्रिय व्यक्ती होण्यापेक्षा रसिक प्रिय व्हायला मला नेहमी आवडते. बिकट आर्थिक परिस्थितीत अर्ध्या बिस्किट पुड्यावर दिवस काढावे लागले. परंतु त्यावेळीही मी माइयातत्वाशी कधीही तडजोड केली नाही. कमीत कमी गरजा पूर्ण केल्यानंतर मला जे करावेसे वाटत होते ते करायला सुरुवात केली. कार्यक्रमाला संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख  व विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह बारामती परिसरातील नागरिक हजर होते. सूत्रसंचालन  विद्यार्थी अनिकेत शिंदे यांने तर पुजा ठोंबरे हिने परिचय करुन दिला. अरुण पुरी यांनी आभार मानले.

 

टॅग्स :BaramatiबारामतीGajendra Ahireगजेंद्र अहिरेcinemaसिनेमाSchoolशाळा