चिमुकल्या कल्याणीला शिक्षकांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:47+5:302021-07-14T04:13:47+5:30
लाखेवाडी (मलठण, ता. शिरूर) शाळेत शिकणाऱ्या कल्याणी भाऊसाहेब मिडगुले या विद्यार्थिनीच्या आईचे ७ मे २०२१ रोजी निधन झाले. तिचे ...

चिमुकल्या कल्याणीला शिक्षकांचा आधार
लाखेवाडी (मलठण, ता. शिरूर) शाळेत शिकणाऱ्या कल्याणी भाऊसाहेब मिडगुले या विद्यार्थिनीच्या आईचे ७ मे २०२१ रोजी निधन झाले. तिचे वडील हे भाऊसाहेब गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करतात. घरामध्ये दुसरा कोणी आधार नाही. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मिडगुले परिवार भले मोठे संकट उभे राहिले. स्वयंपाकाचीही पंचायत झाल्यामुळे दररोज भात खाऊन पोट भरण्याची वेळ त्यांच्यावर व चिमुकलीवर आली आहे. भाऊसाहेब यांचा मोठा मुलगा दहावीत शिकत असून त्यालाही वह्यापुस्तक सोडून हातातील पेन-पुस्तक सोडून भांडी घासण्याची वेळ आली. ते पाहून त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी या कल्याणी मुलीला शैक्षणिक दत्तक घेण्याची तयारी दाखवली. तिचा दहावीपर्यंतचा शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचा शब्द तिच्या वडिलांना दिला व तातडीने वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य दत्तक म्हणून दिले.
--