शिक्षक हे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान : लवांडे

By Admin | Updated: April 29, 2017 03:52 IST2017-04-29T03:52:27+5:302017-04-29T03:52:27+5:30

‘शिक्षक किंवा प्राध्यापक हे युवकांचे स्फूर्तिस्थान असतात. प्राध्यापक म्हणजे अध्ययन व अध्यापन करून त्याचा विस्तार करणारा एवढीच

Teacher Inspiration of Students: Lavande | शिक्षक हे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान : लवांडे

शिक्षक हे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान : लवांडे

मंचर : ‘शिक्षक किंवा प्राध्यापक हे युवकांचे स्फूर्तिस्थान असतात. प्राध्यापक म्हणजे अध्ययन व अध्यापन करून त्याचा विस्तार करणारा एवढीच भूमिका नसून निष्ठावान व चरित्र्यसंपन्न प्राध्यापकामुळे त्यांच्या ज्ञानाबरोबरच गुणांचाही संस्कार विद्यार्थ्यांंवर होत असतो. ती आज काळाची गरज आहे, असे विद्यार्थी घडविण्याचे आदर्श काम डॉ. लक्ष्मणराव घोलप यांनी प्रामाणिकपणे केले आहे. म्हणूनच त्यांचे कार्य नव्या प्राध्यापकाच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल,’ असे विचार अखिल भारतीय अध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. एस. पी. लवांडे यांनी व्यक्तकेले.
अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील डॉ. लक्ष्मण घोलप यांच्या सेवापूर्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. लवांडे बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड होते. यावेळी बाळासाहेब बाणखेले, शरद पवार, ऊर्मिला घोलप उपस्थित होते. डॉ. लक्ष्मण घोलप यांची रयत शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर, पंढरपूर, माढा, श्रीगोंदा व मंचर या शाखेंवर चौवीस वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी म्हणून सोळा वर्षे, तर विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून सहा वर्षे काम केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Teacher Inspiration of Students: Lavande