शिक्षकांच्या फंड प्रस्तावांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:36+5:302021-07-14T04:13:36+5:30

दप्तर दिरंगाई विरोधात रणजित शिवतरे यांचा कारवाईचा ईशारा बारामती : फंड विभागातील दप्तर दिरंगाई विरोधात जिल्हा परिषद पदाधिका-यांकडे ...

For teacher fund proposals | शिक्षकांच्या फंड प्रस्तावांसाठी

शिक्षकांच्या फंड प्रस्तावांसाठी

दप्तर दिरंगाई विरोधात

रणजित शिवतरे यांचा कारवाईचा ईशारा

बारामती : फंड विभागातील दप्तर दिरंगाई विरोधात जिल्हा परिषद पदाधिका-यांकडे दाद मागितली आहे. पदाधिका-यांनी कानउघाडणी केल्यानंतर संबंधितांना जाग आली आहे. पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे दोनशेहून अधिक प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून पडून आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षकांना हक्काचे पैसे मिळत नसल्याने शिक्षकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने फंड विभागातील दप्तर दिरंगाई विरोधात जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्याकडे दाद मागितली, यावेळी झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष शिवतरे यांनी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची झाडाझडती घेतली, उपाध्यक्ष यांच्या प्रश्नांपुढे निरुत्तर झालेल्या शिक्षण विभागाने आठवडाभरात सर्व प्रस्ताव मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे

यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जि. प. सदस्य मोहित ढमाले, शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, नेते राजेंद्र जगताप, कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, तालुकाध्यक्ष रमेश कुंजीर यांच्यासह जिल्हासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते

अडचणीच्या प्रसंगांसाठी शिक्षकांनी पगारातून फंडामध्ये कपात करून ठेवलेली हक्काची रक्कम आजारपण, लग्नकार्य यासादेखील वेळेवर मिळत नाही, सहा महिन्यांची दिरंगाई अजब आहे.

बाळासाहेब मारणे

जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ, पुणे

.

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने फंड विभागातील दप्तर दिरंगाई विरोधात जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्याकडे दाद मागितली.

१३०७२०२१ बारामती—३०

Web Title: For teacher fund proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.