माणूस घडविण्याचे काम शिक्षक करतो
By Admin | Updated: September 5, 2014 00:33 IST2014-09-05T00:33:01+5:302014-09-05T00:33:01+5:30
बालवाडी ते विश्वविद्यापिठीय शिक्षणाच्या सर्व पाय:या चढताना माणूस घडतो.

माणूस घडविण्याचे काम शिक्षक करतो
नारायणपूर : बालवाडी ते विश्वविद्यापिठीय शिक्षणाच्या सर्व पाय:या चढताना माणूस घडतो. या पाय:या चढताना प्रत्येक पायरीवरचा बाजार मनाला अस्वस्थ करतो. पण, हे माणूस घडविण्याचे काम येन-केन प्रकारे शिक्षकालाच करावे लागणार आहे. त्यासाठी शिक्षकाला आपली भूमिका बदलावी लागणार आहे, असे प्रतिपादन माजी उपकुलगुरू प्रा. डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांनी केले.
हिवरे येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी डॉ. शं. ना. नवलगुंदकर बोलत होते. या वेळी दत्ता सावंत, मा. आ. अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, विजय कोलते, प्रा. दिगंबर दुर्गाडे, शिवाजी पोमण, सुदाम इंगळे, माणिक ङोंडे, राहुल शेवाळे, गौरी कुंजीर, बंडूकाका जगताप, बाळासाहेब कामथे, संग्राम सस्ते, योगेश फडतरे, शामकांत भिंताडे, एम.के. गायकवाड, रवींद्र ताकवले, किशोर इंगळे, कल्याण बर्डे, प्रकाश कड, संतोष जगताप, कुंडलिक मेमाणो, मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे, रामदास जगताप, नंदकुमार सागर, बारीकराव खेसे, दिलीप नेवसे, सुनिता रायुडू , अशोक टिळेकर उपस्थित होते.
आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणो (कंसात कार्यरत शाळा) : प्राचार्य . राजकुमार रिकामे (जेजुरी), प्राचार्य. मानसिंग नलावडे (सासवड), मुख्याध्यापक, दीपक गायकवाड (केतकावळे), उपशिक्षक रेखा भागवत (मांडकी), नवनाथ कुंभार (नाझरे क.प.), प्रल्हाद ठोकळे (वाघापुर), सुनिल जाधव (माळशिरस), सुरेश जाधव (काळदरी), बाळासाहेब जगताप (जेजुरी), किशोर भालेराव (कोथळे), नामदेव को-हाळे (सासवड), आप्पासाहेब बनकर (पिंगोरी), निलीमा जाधव (पिंपळे), राणी चाचर (जेजुरी), उषा राजीवडे (भिवरी), दत्तात्नय बुनगे (पिंपरे खु.), विनय तांबे (परिंचे), रुपाली रणनवरे (निरा), एच. एम. आतार (चांबळी), सुभाष काळे (गु-होळी), प्राथमिक शिक्षक अविराज शिंदे (लपतळवाडी), अनिल चाचर (हनुमानवस्ती), संदिप कुंभार (सटलवाडी), अरुणा लवांडे (बो-हाळेमळा), श्रीधर वाघोले (नाटकरवाडी), सुशिला कुंजीर (जगतापवस्ती), उल्का दुर्गाडे (वाल्हे), लिलाचंद साळवी (हरणी), महेश माने (पांगारे), रामदास जगपाप (पांडेश्वर), सविता वैराट (हिवरे).
जालिंदर कामठे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.जितेंद्र देवकर यांनी सूत्नसंचालन केले विकास भोसले यांनी आभार मानले. (वार्ताहर)