दौंडला शिक्षक, विद्याथ्र्याचा गौरव

By Admin | Updated: July 23, 2014 23:18 IST2014-07-23T23:18:22+5:302014-07-23T23:18:22+5:30

महामंडळ पुणो यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक सेवकांचा गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते

Teacher to Daund, Pride of the student | दौंडला शिक्षक, विद्याथ्र्याचा गौरव

दौंडला शिक्षक, विद्याथ्र्याचा गौरव

दौंड : दौंड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणो यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक सेवकांचा गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात तालुक्यातील सुमारे 150 विद्याथ्र्याचा पदक, प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
विद्याथ्र्यानी याच वयात ध्येय निश्चित करुन आपल्या आयुष्याची दिशा ठरवावी असे मोलाचे मार्गदर्शन करुन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढील काळात प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आमदार सावंत यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे ब्रॅड हेड प्रमोशन हेमंत वंदेकर यांनी विद्याथ्र्याना पुढील करिअर विषयक मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी वासुदेव काळे, अप्पासाहेब पवार, महेश भागवत, अरुण थोरात, यांनी मनोगत व्यक्त केली.  यावेळी जगदीश  लोणी, दत्ता चौधरी, नामदेव ताकवणो, जी. के. थोरात, निवृत्ती होले, दादासाहेब नांदखिले, रवी जाधव, अजित निकम, किसन शिंदे, रामभाऊ डोंगरे, संपत बनकर, संदीप गावडे, जहीर शेख, योगेश रंधवान, संतोष दाभाडे उपस्थित होते. 
सूत्रसंचालन आर. व्ही. नातू यांनी केले. प्रास्ताविक दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड यांनी केले. 
दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर. व्ही. गवळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी उल्हास मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.  यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणो, जी. के. थोरात, उमेश वीर, सुनील शर्मा, राजू निकम उपस्थित होते. (वार्ताहर
 

 

Web Title: Teacher to Daund, Pride of the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.