शिक्षकाला 'सप्टेंबर'सुद्धा लिहिता येईना...
By Admin | Updated: October 12, 2015 01:22 IST2015-10-12T01:22:05+5:302015-10-12T01:22:05+5:30
वर्गात मुलं जेमतेम पाच ते सात... शिक्षकांचे मुलांकडे दुर्लक्ष... त्यांना स्वत:लाच 'सप्टेंबर' हा शब्दसुद्धा नीट लिहिता येईना... अशा परिस्थितीत शिक्षक मुलांना शिकवणार तरी काय?

शिक्षकाला 'सप्टेंबर'सुद्धा लिहिता येईना...
तळेघर : वर्गात मुलं जेमतेम पाच ते सात... शिक्षकांचे मुलांकडे दुर्लक्ष... त्यांना स्वत:लाच 'सप्टेंबर' हा शब्दसुद्धा नीट लिहिता येईना... अशा परिस्थितीत शिक्षक मुलांना शिकवणार तरी काय? .. आदिवासी मुलांच्या शिक्षणाची दाहकता दाखवणारी ही परिस्थिती आहे आंबेगाव तालुक्याची पश्चिम आदिवासी भागांतील शाळांची.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा ढासळला असून, कमी पटांच्या शाळांना दोन शिक्षक असून, सात ते बारा पट असणाऱ्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता नसल्याने पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंचायत समितीचे उपसभापती सुभाष तळपे व माजी उपसभापती संजय गवारी यांनी अचानक निगडाळे, राजपूर, माचीचीवाडी, जांभोरी, नांदुरकीचीवाडी, तळेघर आदी शाळांना भेटी दिल्या. आदिवासी भागामध्ये शिक्षणाबाबतची उदासीनता पाहावयास मिळाली. शाळा सुरू झाल्यापासून आजतागायत गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचे आदिवासी भागाकडे दुर्लक्ष झालेले आहे. शिक्षक वेळेवर शाळेवर न जाता आपल्या सोयीनुसार जात असल्याचा प्रत्यक्ष अनुभव तळपे व गवारी यांनी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन घेतला.