खेडच्या गद्दार पंचायत समिती सदस्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST2021-09-06T04:13:24+5:302021-09-06T04:13:24+5:30

राजगुरुनगर : खेड पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे बहुमत असताना राष्ट्रवादीचा सभापती होणे ही बाब सेनेच्या परंपरेत बसत नाही. या ...

Teach a lesson to the members of Khed's Gaddar Panchayat Samiti | खेडच्या गद्दार पंचायत समिती सदस्यांना धडा शिकवा

खेडच्या गद्दार पंचायत समिती सदस्यांना धडा शिकवा

राजगुरुनगर : खेड पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे बहुमत असताना राष्ट्रवादीचा सभापती होणे ही बाब सेनेच्या परंपरेत बसत नाही. या गद्दार सदस्यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा. शिवसेनेच्या गद्दार सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने छुपे बळ दिले. पुढच्या निवडणुकीत खेडमधून शिवसेनेचा आमदार निवडून आणून सूड घेतला जाईल, असा इशारा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना दिला.

खेड तालुका शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना खासदार राऊत बोलत होते. शिवाजीराव आढळराव पाटील,रवींद्र मिर्लेकर,शरद सोनावणे, अशोक खांडेभराड, विजया शिंदे, शिवाजी वरपे, राजू जवळेकर, माऊली कटके, रामदास धनवटे,तनुजा घनवट,बाबाजी काळे, ज्योती आरगडे, ऊर्मिला सांडभोर आदी मान्यवर आणि तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक राजकारणावर बोलताना राऊत म्हणाले, खेडला येण्याची माझी ही दुसरी वेळ आहे. खेड तालुक्यात गलिच्छ राजकारण केले जात आहे. येथील या राजकारणाची आम्ही नोंद घेतली आहे. शिवसैनिकांच्या वाट्याला कोणी जाऊ नका, खेड तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. कार्यकर्त्यांवरील अन्यायाच्या वेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आहेत. योग्य वेळी ते कार्यकर्त्यांना न्याय देतील. आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा शिवसैनिकांनी बदला घ्या, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. पक्षातील कार्यकर्त्यांनी शिस्त ठेवून आमदार दिलीप मोहिते यांना घरी बसवा. जनतेवरील आणि शिवसैनिकांवरील अन्याय थांबवण्यासाठी शिवसैनिकांनी वाड्यावस्त्या, गावागावांत पक्षाचा प्रचार प्रसार करावा. शिवसेना मार खात नाही मार देते, ही भावना मनात ठेवून आगामी निवडणुकीत शिवसेनेचा आमदार निवडून आणा. पंचायत समितीच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आढळराव पाटील म्हणाले, काय घडले, यावर वेळ घालवण्यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागा.

स्व सुरेश गोरे यांच्या काळात शांतता असलेल्या खेड तालुक्याची बिहारपेक्षा वाईट अवस्था केली असे सांगितले. लोकसभा निवडणुकीत आश्वासन देणारे घोडीवर बसून येणार होते. हा घोडीवाला फरार झाला अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली. खोटे गुन्हे दाखल केले. एकजण तीन महिने जेलमध्ये असूनही यांच्यातील जिद्द कायम आहे. शिवसेना म्हणून झुकणार नाही ही त्यांच्यातील भावना आहे. शिवसेनेचा मंत्र आहे. गद्दारांना शिवसेनेत माफी नाही. आमच्या अंगावर येऊ नका आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही जर गेलात तर तुम्हाला उचलण्याची ताकद शिवसैनिकांच्या आहे याचे भान असू द्यात. इकडची दुनिया तिकडे होईल पण पुढचा खेडचा आमदार शिवसेनेचाच होणार, असे राऊत यांनी या वेळी सांगितले.

०५ राजगुरुनगर

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना संजय राऊत. व्यासपीठावर शिवाजीराव आढळराव पाटील, रवींद्र मिर्लेकर, शरद सोनावणे व इतर.

Web Title: Teach a lesson to the members of Khed's Gaddar Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.