शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Tea: अमृततुल्यला ओहोटी, काॅर्पोरेट चहाला भरती, मांडणीवरच्या महाराजांचा पोटासाठी पूजापाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 09:45 IST

Tea News:  पुणे शहराची अमृततुल्य अशी एकेकाळी असलेली ओळख आता लयाला जाऊ लागली आहे. त्याची जागा काॅर्पोरेट लूक असलेल्या दुकानांची साखळी असलेल्या कंपन्या घेऊ लागल्या आहेत.

- राजू इनामदार पुणे : शहराची अमृततुल्य अशी एकेकाळी असलेली ओळख आता लयाला जाऊ लागली आहे. त्याची जागा काॅर्पोरेट लूक असलेल्या दुकानांची साखळी असलेल्या कंपन्या घेऊ लागल्या आहेत. एक हजारपेक्षा जास्त अमृततुल्य असलेल्या पुणे शहरात सध्या केवळ २०० अमृततुल्य शिल्लक आहेत. त्यांनाही अखेरची घरघर लागली आहे.कधीपासून आहेत अमृततुल्य?सन १९२५पासून म्हणजे स्वातंत्र्याच्याही आधीपासून पुणे शहरात अमृततुल्य ही चहाची दुकाने सुरू झाली. पहाटे ५ वाजता चहाचा पहिला कप रस्त्यावर देवाला अर्पण करून सुरू होणार व रात्री ९ वाजता बंद होणार ही त्यांची खासीयत. मुंबईत जशी इराण्याची हॉटेल तशी पुण्यात अमृततुल्य. पोटापाण्यासाठी म्हणून पुण्यात आलेल्या राजस्थानी समाजातील दवे, बोरा अशा मंडळींनी कमी भांडवलातील म्हणून हा व्यवसाय सुरू केला.कशी असतात ही दुकाने?१० गुणिले १५ चौरस फुटांची किंवा त्यापेक्षा एखादी मोठी जागा. एका कोपऱ्यात ॲल्युमिनियम धातूची एक मांडणी, त्यावर महाराज बसलेले व त्याच्यासमोरच्या स्टोव्हवर एका पातेल्यात उकळत असलेले चहाचे आंधण. ही या दुकानांची ओळख, अमृततुल्य हे नाव सार्थ होईल, असा आले, वेलची घातलेला फर्मास चहा तिथे मिळतो. बसायला बाकडे, चहाचे कप ठेवायला टेबल, पाणी प्यायला ग्लास.का लागली ओहोटी?आकर्षक सजावट केलेल्या चहाच्या दुकानांनी अमृततुल्य हॉटेल चालकांना मात दिली असल्याचे दिसते आहे. जुने फर्निचर, जुनी सजावट यामुळे व्यवसाय कमी होऊन अमृततुल्य चालकांनीच आपली दुकाने या नव्या कंपन्यांच्या हवाली केल्याचीही उदाहरणे आहेत.काय करतात चालक?बहुसंख्य अमृततुल्य चालक राजस्थानी महाराज होते. त्यांनी दुकान बंद झाल्यावर पोटापाण्यासाठी पूजापाठ सांगण्यास सुरूवात केली, अशी माहिती मिळाली. काहींनी वेगळा व्यवसाय सुरू केला. अनेक वर्षांचे दुकान व्यवसायच होत नसल्यामुळे बंद करावे लागले, असे काहींनी सांगितले.

बदल हा तर व्हायलाच पाहिजे. आम्ही नवे चकचकीत फर्निचर आणले. स्टाईल नवी आणली. चहातही बदल केले. त्याचा फायदा आम्हाला होतो आहे. कोणाची दुकाने बंद व्हावीत, असा आमचा उद्देश नव्हताच.- कॉर्पोरेट ट्रेडमार्क असलेल्या चहाच्या दुकानांचे चालक

आमच्यासारखा चहा कोणताही काॅर्पोरेट लूक चहावाला तयार करूच शकणार नाही. पुढील पिढीला आमच्या या व्यवसायात रस नाही. मांडणीवर दिवसभर बसायचे म्हणजे कष्ट लागतात. ते नव्या पिढीला जमत नाहीत. त्यामुळे अमृततुल्यचा बहर ओसरला.- अजित बोरा, अध्यक्ष, पुणे शहर अमृततुल्य चालक संघटना

टॅग्स :Puneपुणे