ता:यांच्या स्फोटाचा अभ्यास करावा
By Admin | Updated: November 28, 2014 01:06 IST2014-11-28T01:06:18+5:302014-11-28T01:06:18+5:30
भास्कराचार्यानी गणिताच्या आधारे अनेक खगोलीय निरीक्षणो नोंदविली आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांना न्यूटनच्या 5क्क् वर्षे अगोदर लागला होता.

ता:यांच्या स्फोटाचा अभ्यास करावा
पुणो : भास्कराचार्यानी गणिताच्या आधारे अनेक खगोलीय निरीक्षणो नोंदविली आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांना न्यूटनच्या 5क्क् वर्षे अगोदर लागला होता. मात्र, हे निरीक्षण गणितीय नव्हते. त्यामुळे त्याला कोणताही आधार नव्हता. पृथ्वीभोवती सात आवरणो असून, त्याला भास्कराचार्यानी नावे दिली होती.
भारतात प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक खगोलीय घटनांचा उल्लेख आहे, त्याचा अभ्यासकांनी शोध घ्यावा. ‘ता:यांचा स्फोट’याविषयी अभ्यास करावा, असे आवाहन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाचा गणित विभाग, इंडियन सोसायटी फॉर हिस्ट्री फॅार मॅथ्स, भास्कराचार्य प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गणितपरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रा. सरोजा भाटे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले.
प्रा. एस. जी. दाणी, समन्वयक प्रा. एम. एस. श्रीराम, विभागप्रमुख डी. ए. कत्रे या वेळी उपस्थित होते.
भारतात भास्कराचार्यानी गणिताचा पाया घातला. त्यानंतरही अनेक तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी गणित विषयामध्ये आपले योगदान
दिले.
मात्र, एका घटनेने अद्यापही मला अचंबित केले आहे. त्याविषयीची नोंद चीन, अमेरिका, जपान या देशांमध्ये सापडते. मात्र, भारतात त्याविषयीची नोंद नाही. त्याचा तज्ज्ञांनी शोध घ्यावा, असे नारळीकर म्हणाले. (प्रतिनिधी)
‘त्या’ घटनेचा भारताने शोध घ्यावा
4चीनमध्ये दर वर्षी तेथील राजाच्या उपस्थितीमध्ये एक उत्सव होत असे. त्या उत्सवादरम्यान केलेल्या खगोलीय निरीक्षणामध्ये अवकाशात एक नवा तारा आढळून आला. त्याची चीनमध्ये ‘गेस्ट स्टार’ अशी नोंद झाली. तो दिवस 4 जुलै 1क्56 असा होता. याच घटनेची नोंद त्याचवेळी अमेरिका, जपान आणि मध्यपूव्रेतील देशांनी घेतली होती. मात्र, भारतात याचा उल्लेख कुठेही नाही. खगोलप्रेमी किंवा तज्ज्ञांनी त्याचा शोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.