शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोप्रमाणे रस्त्यांच्या दोन्ही बाजूला टीडीआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 01:55 IST

बहुप्रतीक्षित शहरातील अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी (एचसीएमटीआर) येत्या दहा दिवसांमध्ये एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट मागवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

पुणे : बहुप्रतीक्षित शहरातील अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी (एचसीएमटीआर) येत्या दहा दिवसांमध्ये एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट मागवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.पुणे शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एचसीएमटीआर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी निधी उभा करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. मेट्रोप्रमाणे एचसीएमटीआरच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क), जाहिरात हक्क आणि कर्ज उभारणी अशा पर्यायांवर विचार करण्यात येत आहे. या प्रकल्पाला अधिक बळकटी मिळावी यासाठी राज्यशासनाची प्रकल्पाला मंजुरी घेण्यात येणार आहे. राज्यशासनाकडे यासंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे राव यांनी सांगितले.एचसीएमटीआर प्रकल्पासाठी मोठा निधी लागणार आहे. ३७ किलोमीटरच्या या रस्त्यासाठी ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी आरक्षित भूसंपादन रोखे देण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनाला रोख रक्कम मोजावी लागणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पासाठी निधी उभारणीचे सर्वांत महत्त्वाचे काम यापुढील काळात करण्यात येणार आहे.जाहिरात हक्क, टीडीआर आणि कर्ज उभारणी अशा पर्यायांचा अभ्यास सध्या महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. पालिका सर्व पर्यायांचा विचार करून योग्य निर्णय घेणार आहे. महापालिकेने या प्रकल्पासाठी कर्ज उभारल्यास विविध पर्यायांच्या माध्यमातून कर्ज परतफेड होऊ शकते. पुणे महापालिकेची बाजारामधील पत उत्तम असल्यामुळे ८ ते ९ टक्के दराने आपल्याला कर्ज मिळू शकेल, असे राव यांनी सांगितले.एचसीएमटीआर रस्त्यावर३७ किलोमीटरची बीआरटीपुणे शहरामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक परदेशी कंपन्या आणि बँका उत्सुक आहेत. महामेट्रो कंपनीला फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी या वित्तसंस्थेने शहरातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.यासंदर्भात दोन बैठका झाल्या आहेत. शहरात पार्किंग धोरण, मेट्रो आणि पीएमपी यांच्या मध्ये ससूत्रता, त्याचबरोबर बीआरटीचे विस्तारीकरण, बस खरेदीसाठी ही संस्था गुंतवणूक करण्यास तयार आहे. आपण त्यामुळे एचसीएमटीआर रस्त्यावर ३७ किलोमीटरचा बीआरटी प्रकल्प करणार असल्याचे राव यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे